Georgia: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या; चेहऱ्यावर ५० वेळा वार, चित्तथरारक व्हिडीओ व्हायरल

Indian Student killed in America: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हत्येची ही घटना घडली आहे. विवेक ज्या दुकानात काम करत होता तिथे १६ जानेवारी रोजी जूलियन आला होता.
Indian Student killed in America
Indian Student killed in AmericaSaam TV

US Homeless Man Killed Indian Student:

अमेरिकेमधील जॉर्जियामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. अगदी क्रूरतेने आणि निर्दयीपणे या विद्यार्थ्याला संपवण्यात आलंय. हातावर पाठीवर आणि तोंडावर घाव केल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. सदर घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Indian Student killed in America
India-America Nikhil Gupta: ''हे आमच्या देशाच्या धोरणाविरोधात...'' पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपानंतर भारताचं अमेरिकेला उत्तर

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विवेक सैनी असं या भारतीय विद्यार्थ्याचं नाव आहे. २५ वर्षिय विवेक क्लीवलँड रोड येथे एका दुकानात नोकरी करत होता. जूलियन फॉकनर (वय ५३) असं आरोपीचं नाव आहे. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करतायत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हत्येची ही घटना घडली आहे. विवेक ज्या दुकानात काम करत होता तिथे १६ जानेवारी रोजी जूलियन आला होता. तो बेघर असून रस्त्यावर निवाऱ्यासाठी जागा शोधत होता. बाहेर जास्त थंडी असल्याने विवेकसह दुकानातील अन्य व्यक्तींनी त्याला राहण्यासाठी दुकानातच जागा दिली.

तसेच त्याला खाण्यापिन्याच्या वस्तू आणि एक स्वेटर दिले. २ दिवस तो तिथेच राहिला. मत्र तो कायमचा तेथे राहू शकत नव्हता. १८ तारखेला विवेकने त्याला स्वत:ची दुसरीकडे सोय करण्यास सांगितले. तो येथून न गेल्यास पोलिसांना बोलावण्यात येईल असेही सांगितले.

पोलीसांचं नाव ऐकल्याने जूलियनला राग आला. रात्री काम आटपून विवेक घरी निघाला होता. त्यावेळी जूलियनने विवेकच्या डोक्यावर पाठून वार केला. तसेच त्याने विवेकच्या डोक्यावर, पाठीवर आणि तोंडावर देखील चाकूने आणि रॉडने वारंवार एकूण ५० वेळा वार केले.

Indian Student killed in America
UP Crime News: धक्कादायक! पती-पत्नीसह तीन मुलांचा होरपळून मृत्यू , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com