Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची निर्घृण हत्या; कोपरगाव तालुक्यात खळबळ

Kopargaon Crime News: किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाल्यानंतर हा हल्ला करण्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Ahmednagar Crime News: अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री ९ च्या सुमारास गुरूराज पेट्रोल (Gururaj Petrol) पंपावर तीन तरुण दुचाकीवरुन आले. यावेळी पेट्रोल पंपाचे कर्मचारी आणि या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. ज्यानंतर या तरुणांनी थेट चाकूने पेट्रोल पंपाचे मॅनेजर भोजराज घनघाव याच्यावर धारदार शस्राने हल्ला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर तात्काळ त्याला रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रस्त्यातच या युवकाचा मृत्यू झाला.

घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या हल्ल्यात संतोष मोरे हा कर्मचारीही गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पुढील तपास सुरू केला आहे. या हत्येचा संपूर्ण थरार सीसीटिव्हीत कैद झाला असून किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाल्यानंतर हा हल्ला करण्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावलं

Maharashtra Marriage Crisis : लग्नाच्या नावाखाली दलालांनी लुटलं, तरुणांनी केली आत्महत्या, राज्यातील भीषण वास्तव

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट; ११ जण जिवंत जळाले

Akola Bhondubaba: महाराष्ट्राला अंधश्रद्धेचा विळखा, भोंदूबाबाचा चिमुकल्यांशी जीवघेणा खेळ; संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Homemade Conditioner Tips: केस धुतल्यानंतर लावा खास 'होममेड कंडिशनर', केस होतील मऊ आणि मुलायम

SCROLL FOR NEXT