सुशील थोरात, अहमदनगर|ता. २८ जानेवारी २०२४
राजकीय मैदानात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू असून राज्यभर कार्यकर्ते मेळावे आणि जाहीर सभा पार पडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नगरमध्ये राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली.
"अहमदनगरमध्ये भगवे वातावरण झाले आहे. माजी आमदार अनिल राठोड असताना त्यांनी शिवसेना जिवंत ठेवली होती मात्र आता शहरात गुंडगिरी वाढली, अनिल राठोड नाहीत म्हणून कोणी संघर्ष करत नाही मग तुम्ही का रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे आता आम्ही ठरवले आहे. आता मी रस्त्यावर उतरेल आमदाराविरुद्ध महाविकास आघाडीचा मोर्चा निघेल त्याचे नेतृत्व मी करेल," असे आश्वासन संजय राऊत यांनी दिले.
"बाळासाहेब ठाकरेंनी सर्वसामान्य जनतेसाठी ही शिवसेना स्थापन केली होती. इलेक्शन कमिशन किंवा राहुल नार्वेकर यांना विचारून स्थापन केली नव्हती. देशात गरीब जनतेला जाऊन विचारा शिवसेना कोणाची? ते सांगतील शिवसेना उद्धव ठाकरेंची, बाळासाहेबांची, शिवसेना शिवसैनिकांची आहे, असे राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरही (PM Narendra Modi) निशाणा साधला. "रामाबरोबर हाताला काम सुद्धा द्या. महागाईवर पंतप्रधान बोलत नाहीत त्यांना रडू कोसळते रामाची मूर्ती पाहून. मात्र पुलवामा मध्ये 40 जवान शहीद झाले तेव्हा रडले नाहीत, शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा रडत नाही, काश्मीरमध्ये हजारो पंडितांचे वध होतात तेव्हा रडत नाही मात्र आता नाटक करता?" अशी टीका संजय राऊत यांनी केली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.