Raj Thackeray On Marathi: राज्यातील सर्वच शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी सक्ती करा; राज ठाकरे विश्व मराठी संमेलनातून गरजले

Raj Thackeray On Marathi News: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या मंचावरून केली.
Raj Thackeray On Marathi
Raj Thackeray On MarathiSaam Digital
Published On

Raj Thackeray On Marathi

महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही. मराठी, तामीळ भाषांप्रमाणे हिंदी उत्तम भाषा, पण ती आपली राष्ट्र भाषा नव्हे असे म्हणत पंतप्रधानांना जर आपल्या गुजरात विषयी प्रमे असेल तर आपण मराठी लोक का मागे आहोत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या मंचावरून केली.

हिंदी भाषेची कधीच राष्ट्रभाषा म्हणून निवड करण्यात आलेली नाही. फक्त केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये समन्वायाची ती भाषा आहे. आजपर्यंत कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही. २० वर्षांपूर्वी हाच मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी अनेकांनी विरोध केला. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले त्यामुळे त्या भाषेचा प्रभाव आमच्यावर झाला. पण मराठी लोक आपल्याच राज्यात हिंदी का बोलतात असा सवाल राज ठाकरेंनी केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधानांना गुजरातविषयीचं प्रेम लपवता आलं नाही

मराठी भाषेबद्दल मराठी लोकचं खूप संकुचित आहेत. त्यांना मराठी बोलायला लाज वाटते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्यांच्या स्वतःच्या गुजरात राज्यात उभे करावा वाटतो. हिऱ्यांचा व्यापार त्यांनी गुजरातमध्ये घेऊन जावासा वाटतो. पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही आम्ही मराठी लोक का आपल्या राज्याविषयी मराठी भाषेवरच प्रेम लपवत आहे, असा थेट सवाल त्यांनी राज्यातील जनतेला केला.

Raj Thackeray On Marathi
Buldhana Politics News: रविकांत तुपकरांच्या कानाखाली आवाज काढावाच लागेल; शिंदे गटातील आमदाराचं विधान

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विजेल

मुंबईमध्ये एखादा मराठी माणूस अमराठी मालक किंवा बिल्डरकडे घर मागायला जातो, त्यावेळी मराठी माणसाला घर नाकरालं जातं. त्यावेळी मराठी माणसांवर स्वतःच्याच राज्यात हा अन्याय होत नाही का. हेच तामिळनाडू किंवा इतर कोणत्याही राज्यात होत नाही. मग महाराष्ट्रातचं का? आमचं धोरणच याला कारणीभूत आहे. महाराष्ट्रातील माणसाकडे घर घेण्याइतपत पैसे नसतील म्हणून हे असे प्रकार होतात. मात्र एकदा महाराष्ट्र फिरून बघा महाराष्ट्राची प्रगती आणि इथल्या माणसांची श्रीमंती किती आहे. ''भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विजेल'' कुसूमाग्रजांच्या कवितेली ही पंक्ती वाचून त्यांनी भाषेच मरत्त्व विषद केलं.

Raj Thackeray On Marathi
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध, निर्णयाशी सहमत नसल्याचं केलं स्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com