सचिन बनसोडे, साम टीव्ही
श्रीरामपूर/अहिल्यानगर: वाढत्या गुन्हेगारी घटना आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येमुळे श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली असून, गेल्या तीन दिवसांपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. पोलिसांनी आता गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. सरस्वती कॉलनी परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांना एका बंद फ्लॅटमधून गावठी कट्टा, काडतुसे आणि मेडिकल संबंधी काही कागदपत्रे मिळून आली आहेत.
श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात, एका फ्लॅटमध्ये मुलीला डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार काल रात्री पोलिस पथकाने संबंधित बंद फ्लॅटवर धाड टाकली असता, तिथे कोणतीही मुलगी आढळून आली नाही. मात्र या घरातून पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन काडतुसे, बँक पासबुक आणि काही मेडिकल रिपोर्ट हस्तगत केले आहेत. संबंधित फ्लॅट हा शहरातील एका व्यक्तीच्या नावे आहे, मात्र करारनामा करून तो पढेगाव येथील शिवांजय उंडे या तरुणाला भाडोत्री देण्यात आला होता.
उंडे याच्या माध्यमातून या फ्लॅटमध्ये सोनू उर्फ जयप्रकाश बेग हा एका महिलेसह वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सोनू बेग याला काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बेग हा संबंधित फ्लॅटमधून श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारी टोळी चालवत असून, विक्रीसाठी तसेच गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी हत्यारे बाळगत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी शिवांजय बाळासाहेब उंडे, सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग आणि श्रद्धा जयप्रकाश बेग यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.