अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. राम भक्तांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या देणगीवर डल्ला मारणाऱ्या आरोपींची एसआयटीकडून कसून चौकशी केली जातेय. या चौकशीतून आरोपींचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. आरोपींची तब्बल 40 तास चौकशी करण्यात आलीये. यात राम मंदिरातला चोरीचा पैसा शेअर बाजारात गुंतवल्याची धक्कादायक माहिती या चौकशीतून समोर आलीय...चौकशीत अजून काय समोर आलंय ते पाहूयात..
राम मंदिर चोरीतील पैसा शेअर बाजारात?
राम मंदिराचे कर्मचारी अनुकल्प आणि अविनाश मिश्रानं दानपेटीतील कोट्यवधी रुपये चोरले
चोरीच्या पैशांचा मोठा हिस्सा त्यांनी थेट शेअर बाजार आणि ट्रेडिंगमध्ये गुंतवला
यूपी पोलिसांनी कारवाई करत आरोपींची तब्बल 30 बँक खाती गोठवली
चोरीच्या पैशातून आरोपींनी महागड्या गाड्या, मोकळे भूखंड आणि इतर मालमत्ता खरेदी केली
राम मंदिर दान चोरी प्रकरणातील रक्कम शेकडो कोटींच्या घरात असल्याचं बोललं जातंय. हा चोरीचा पैसा आरोपींनी कुठं वळवला होता, या प्रश्नावर तपासातून हे उघड झालंय. पोलीस तपासांत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या चोरीच्या पैश्यातून आरोपींनी बक्कळ कमाई करण्यासाठी नवनवे फंडे शोधल्याचं उघड झालंय. इतकंच नव्हे तर पोलिसांनी आरोपींच्या घरातून नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने आणि कार जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय नवे खुलासे समोर येणार, याकडे रामभक्तांचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.