sagar moholkar case Saam tv
महाराष्ट्र

पैलवान मोहोळकरवर कुणी गोळीबार केला? पुण्यातून एक जण ताब्यात, घायवळ गँग कनेक्शनचाही तपास होणार

Sagar Moholkar Case: पैलवान मोहोळकरवर नेमका कुणी गोळीबार केला, याचा पोलिसांत केला जाणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना

जखमी मोहोळकर यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू

या प्रकरणात पुण्यातून आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गुंड मोहोळकर याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून एकाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी पुण्याचा रहिवासी असून पोलिसांकडून गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

पैलवान सागर मोहोळकरवर फायरिंग करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी पुण्याचा आहे. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आलं आहे.

मोहोळकर चर्चेत का आला?

नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जमखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते, या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हा पासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

या घटनेचे धागेदोरे पुण्यापर्यंत जाऊन पोहोचले असून अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू होते, या ताब्यात घेऊन अधिक माहिती घेऊन यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या पूर्ण नाव माहित नाही, या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती घेतली असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या आरोपींकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. या गोळीबारामागे गुंड निलेश घायवळ याचे काही कनेक्शन आहे का याबाबत आता पोलीस तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update : गुरुवारी ठाण्यात पाणी नाही

Kolhapur Tourism : रोड ट्रिपसाठी 'हे' आहे महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण, कोल्हापूर ते कोकण प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील

Dadpe pohe Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा महाराष्ट्रीयन स्पेशल दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

मंत्र्यांवर अनैतिक संबंधाचा आरोप; बायकोने नको त्या अवस्थेत पाहिलं, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT