Kalyan News : कल्याण- डोंबिवलीतील महिलांनी इतिहास रचला; विश्वविक्रमाची 'गिनीज'मध्ये नोंद, वाचा सविस्तर

international women day : कल्याण- डोंबिवलीतील महिलांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या विश्वविक्रमाची 'गिनीज'मध्ये नोंद झाली आहे.
women day
international women day Saam tv
Published On
Summary

९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास

मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

सामूहिक लेझीमसाठी महिला एकवटल्या

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

जागतिक महिला दिन राज्यभरातील विविध भागात साजरा केला जात आहे. कल्याण- डोंबिवलीतही महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादन केलं. इतक्या संख्येने महिला एकत्र आल्याने त्यांचा विश्वविक्रम झाला. त्याची नोंद 'गिनीज'मध्येही झाली. यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात लेझीम वादन स्पर्धेसाठी श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला एकत्र आल्या. तब्बल ९,१११ इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

women day
'डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला, त्यामुळे...; राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची सोशल मीडियावर खास पोस्ट

सांगलीकरांच्या नावाने या आधी हा रेकॉर्ड होता. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन विक्रम केला होता.यंदा तो विक्रम डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर करण्यात आले. महिलांनी साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करत रेकॉर्ड मोडला. कार्यक्रमानंतर रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

women day
घाटातून जाताना भरधाव बस रस्त्यावर उलटली; पाच महिन्याच्या बाळासह ५ प्रवाशांचा मृत्यू

महिला दिनानिमित्त महिला आणि विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केल्याचा डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे. मी भारत मातेच्या चरणी हा रेकॉर्ड समर्पित करतो असे चव्हाण यांनी सांगितले. कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीनेही आभार मानले. रेकॉर्ड केल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. या रेकॉर्डचे हजारो डोंबिवलीकरांनी स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com