Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

Kolhapur Gokul President Election Update: कोल्हापुरातील गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.
Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?
Gokul President ElectionSaam Tv
Published On: 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा फैसला आज होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आज गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शशिकांत पाटील-चुयेकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासन नियुक्त चार सदस्य या सभेत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे ४ सदस्य मतदान करतील असं महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

गोकुळ अध्यक्ष पदाच्या निवडुकीत मोठी अपडेट समोर आली आहे. अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची सीमा भागातील अज्ञात स्थळी बैठक सुरू आहे. बैठकीला मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह महायुतीचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. सध्या गोकुळचा अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून आपलाच अध्यक्ष व्हावा यासाठी चढाओढ सुरू आहे.

गोकुळ अध्यक्ष निवडीत मतदानाचा पेच!

एकूण निवडून आलेले संचालक – २५

समविचारी आघाडी – १३

महायुती – १२

पर्याय क्रमांक १ :

२५ संचालक + ४ शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार

समविचारी आघाडी – १३ संचालक

महायुती – १२ संचालक

पर्याय क्रमांक २ :

शासन नियुक्त चार संचालकांनाही मतदानाचा अधिकार

महायुती – १२ + ४ = १६ मते

समविचारी आघाडी – १३ मते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.