Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पत्नी ऐना कोनिडालाला घटस्फोट दिला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली.
Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल
Andhra Pradesh Deputy CM Pawan KalyanSaam Tv
Published On: 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा घटस्फोट झाला. पवन कल्याण आणि त्यांची पत्नी ऐना कोनिडाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली. १३ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टनुसार, घटस्फोटाचा निर्णय परस्पर सामंजस्य आणि आदराने घेण्यात आला आहे. पवन कल्याण आणि त्यांच्या पत्नीचे विभक्त होण्याची ही तिसरी वेळ आहे.

पवन कल्याण यांनी १९९७ साली नंदिनीसोबत पहिले लग्न केले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. २००९ साली पवन कल्याण यांनी अभिनेत्री-मॉडेल रेणू देसाईसोबत लग्न केले. त्यांचे लग्न २०१२ पर्यंत टिकले आणि त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. पवन कल्याण आणि रेणू देसाई यांना अकिरा नंदन आणि आध्या ही दोन मुलं आहेत. २०१३ साली पवन कल्याण यांनी मूळच्या रशियाच्या असलेल्या ऐना कोनिडालासोबत तिसरे लग्न केले. त्यांना पोलिना अंजना पवनोवा आणि मार्क शंकर पवनोविच ही दोन मुलं आहेत. १३ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

पवन कल्याण आणि ऐना कोनिडाला यांच्या घटस्फोटासंदर्भात उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, 'आयुष्याचा महत्त्वपूर्ण काळ एकत्र घालवल्यानंतर आम्ही परस्पर सामंजस्य आणि आदराने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जरी आमचे लग्न संपुष्टात आले असले तरी आम्ही चांगले मित्र राहू आणि आमच्या मुलांचे समर्पित पालक म्हणून आमची भूमिका अशीच कायम ठेवू. आमच्या मुलांचे सुख आणि कल्याण हेच आमचे नेहमी प्राधान्य असेल.'

पवन कल्याण आणि ऐना कोनिडाला यांनी घटस्फोट घेतल्याचा निर्णय जाहीर करताना सर्वांना त्यांच्या आयुष्यातील या वैयक्तिक बदलाच्या काळात त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले. या काळात त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सर्वांचे दोघांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री पवान कल्याण यांचा तिसऱ्यांचा घटस्फोट झाल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.