Ahilyanagar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Water Crisis : मार्च महिन्यातच पाण्यासाठी भटकंती; अहिल्यानगर तालुक्यातील १२ गावातील भीषण वास्तव्य

Ahilyanagar News : अहिल्यानगरपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मदडगावात पाण्यासाठी महिलांना पायपीट करत वणवण करावी लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहिल्यानगर : राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार अहिल्यानगर तालुक्यातील जवळपास १२ गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या गावांमधील नागरिकांना गावांपासून काही अंतरापर्यंत पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. याठिकाणी पाणी ट्रॅकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे. 

मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील काही भागात टंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अहिल्यानगर तालुक्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायण डोह, मदडगाव, बालेवाडी, सांडवे, हिवरे झरे आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या- वस्त्या अशा बारा गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गावामध्ये टँकर सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे. 

तळ्यातून आणावे लागतेय पाणी 

अहिल्यानगरपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मदडगावात पाण्यासाठी महिलांना पायपीट करत वणवण करावी लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. वापरण्याचे पाणी हे एका तळ्यातून आणण्यात येत आहे. मात्र त्याचा दर्जा अतिशय खराब असल्याने ते वापरण्याच्याही लायकीचे नाही तर पिण्यास देखील योग्य नसल्याचे सांगितले जात आहे.

जलजीवन मिशनचे कामे निकृष्ट 

अहिल्यानगर तालुक्यातील या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे झालेली आहेत. मात्र ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप करत शासनाचे कोट्यवधी रुपये यात वाया गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे दरवर्षी या गावाला पाण्यासाठी झगडावे लागत आहे. आता गावांसाठी पाण्याचे ट्रॅकर सुरु करावे तसेच ट्रॅकर मंजुरीची प्रक्रिया वेगाने करावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT