Latur Crime : भररस्त्यावर टोळक्याकडून तरुणांना बेदम मारहाण; दोघे गंभीर जखमी

Latur News : लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात सदरची घटना घडली आहे. रस्त्यावर टवाळखोर तरुणांकडून हैदोस मांडण्यात आला आहे. यातच उदगीर शहरात सदरची घटना समोर आली आहे
Latur Crime
Latur CrimeSaam tv
Published On

संदीप भोसले 

लातूर : महाविद्यालयीन दोन तरुणांना रस्त्यावर अडवून टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उदगीर शहरात समोर आली आहे. भररस्त्यात झालेल्या फ्रीस्टाइल मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दोघा जखमी तरुणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात सदरची घटना घडली आहे. रस्त्यावर टवाळखोर तरुणांकडून हैदोस मांडण्यात आला आहे. यातच उदगीर शहरात सदरची घटना समोर आली आहे. यात टोळक्याकडून दोन तरुणांना बेदम दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. भररस्त्यात हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

Latur Crime
Bhusawal Crime : भुसावळ पुन्हा हादरले; पत्नीशी दारूच्या नशेत वाद, पहाटे घरातील दृश्य पाहून कुटुंब हादरले

गावाकडे जाणाऱ्यांना रस्त्यात अडविले 

दरम्यान उदगीर वरून गावाकडे जाणाऱ्या दोन तरुणांना टवाळखोर तरुणांच्या टोळक्याने रस्त्यात अडविले. यानंतर त्या दोघांना दगडाने तसेच लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या मारहाणीत संगम बिराजदार आणि कृष्णा कनकुरे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Latur Crime
Cylinder Blast : रिक्षामध्ये ऑक्सीजन सिलेंडर ठेवताना स्फोट; एकाचा मृत्यू, दोनजण जखमी

पोलिसांकडून दखल नाही 

दरम्यान भर रस्त्यात झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यात दोन्ही तरुणांना लाथाबुक्यांनी मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र पोलिस तक्रार देऊनही पोलीस तक्रार घेत नसल्याचा जखमींच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com