Ahilyanagar Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: विद्युत पंप सुरू करताना शेततळ्यात पडली, महिलेला वाचवण्यात यश; पण मदतीसाठी गेलेल्या नवऱ्यासह दोघांचा मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये भयंकर घटना घडली. शेततळ्यात पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहता तालुक्यातील अस्तगाव परिसरातील चोळकेवाडीमध्ये ही घटना घडली.

Priya More

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये शेततळ्यात पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दोघांनी महिलेचे प्राण वाचवले पण त्यांना शेततळ्यातून बाहेर येता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना राहता तालुक्यातील अस्तगाव परिसरात घडली. या घटनेमध्ये रामदास सखाहारी चोळके (वय ५६ वर्षे) आणि आदेश आण्णासाहेब नळे (वय २२ वर्षे) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामदास हे वारकरी संप्रदायातील होते तर आदेश हा अविवाहित तरुण होता. या घटनेने चोळकेवाडीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहता तालुक्यातील अस्तगाव परिसरातील चोळकेवाडी येथे ही घटना घडली. शेततळ्यावर महिला विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेली होती. पण अचानक या महिलेचा पाय घसरला आणि ती शेततळ्यात पडली. महिला बुडत असल्याचे पाहून तिच्या नवऱ्याने शेततळ्यात उडी मारली. हे दोघेही बुडत असल्याचे पाहून शेजारीच काम करत असलेल्या तरुणाने शेततळ्यात उडी मारली. या घटनेत महिलेचे प्राण वाचले. पण तिचा नवरा आणि तरुणाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अस्तगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने शेततळ्याचा भराव तोडून पाणी सोडून दिलं त्यानंतर दोघांचेही मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले.

पोलिसांनी सांगितले की, रामदास चोळके आणि त्यांच्या पत्नी सुमनबाई चोळके हे स्वतःच्या शेततळ्यावर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. सुमनबाई यांचा पाय शेततळ्याच्या प्लास्टिक कागदावर घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. बायकोला वाचवण्यासाठी रामदास यांनी तातडीने शेततळ्यात उडी घेतली आणि मदतीसाठी ओरडले. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या सूनबाईंनी आरडाओरड केली त्यामुळे शेजारील तरुण आदेश नळे धावत आला.

आदेश नळेने नवरा-बायको बुडत असल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न करता शेततळ्यात उडी मारली. आदेशने सुमनबाईंना ढकलत शेततळ्याच्या काठावर आणले. तिथे जमलेल्या रहिवाशांनी दोराच्या साहाय्याने सुमनबाईंना बाहेर काढले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या घटनेत रामदास आणि आदेश पोहता-पोहता थकले आणि ते बुडू लागले. रहिवाशांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेर जेसीबीच्या साहाय्याने शेततळ्याचा भराव तोडून पाणी सोडले आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT