Crime News: तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेले मृतदेह, खिशात कुंकू; हादरलेल्या गावकऱ्यांना भलताच संशय

Bihar Police: बिहारमध्ये तरुण-तरुणीचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली. या दोघांची हत्या करून मृतदेह नंतर झाडाला लटकवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस घेत आहेत.
Crime News: तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेले मृतदेह, खिशात कुंकू; हादरलेल्या गावकऱ्यांना भलताच संशय
Bihar Crime NewsSaam tv
Published On

बिहारमध्ये रविवारी तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या परिसरातील एका बागेत या तरुण आणि तरुणीचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणी लौरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी होते. दोघांचेही मृतदेह बागेतील एका झाडाला एकत्र लटकलेले आढळले. दोघांचेही पाय जमिनीला स्पर्श करत होते. हत्या करून दोघांचे मृतदेह झाडाला लटकवल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Crime News: तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेले मृतदेह, खिशात कुंकू; हादरलेल्या गावकऱ्यांना भलताच संशय
Crime News: 57 वर्षाच्या महिलेचं राक्षसी कृत्य; गाढ झोपेत असलेल्या जोडीदाराला जिंवत जाळलं, कारण ऐकून पोलीस चक्रावले

रविवारी दुपारी काही मुलं बागेत खेळायला गेली होती. तिथे त्यांना एका झाडाला तरुण आणि तरुणीचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. या मुलांनी तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दोघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत होते.

Crime News: तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेले मृतदेह, खिशात कुंकू; हादरलेल्या गावकऱ्यांना भलताच संशय
Crime Shocking: 'महिला आहेत, लघुशंका करू नका' तिघांना राग अनावर, हॉटेल व्यवसायिकाच्या मुलावर गोळ्या झाडल्या

पोलिसांनी तात्काळ मोतिहारीहून एफएसएल टीमला बोलावले. यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तरुणाच्या खिशात कुंकाचे पाकिट सापडले. तर मृत तरुणीच्या भांगेमध्ये कुंकू लावल्याचे दिसून आले. दोघांचीही हत्या करण्यात आली असल्याचा आणि त्यांचे मृतदेह लटकवून आत्महत्येचे चित्र उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. पोलिस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime News: तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेले मृतदेह, खिशात कुंकू; हादरलेल्या गावकऱ्यांना भलताच संशय
Sambhajinagar Crime: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, दोरीनं बांधून घरात डांबून ठेवलं; शरीरावर १७ ठिकाणी दिले चटके

तरुणाच्या आईने सांगितले की, माझा मुलगा शनिवारी रात्री १० वाजता जेवणानंतर बाहेर फिरायला गेला होता. यानंतर तो घरी परत आलाच नाही. मी रात्रीपासून त्याला शोधत होतो. दुपारी लोकांनी मला सांगितले की माझ्या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे. त्याचे वडील नोकरीनिमित्त बाहेर राहतात. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Crime News: तरुण-तरुणीचे झाडाला लटकलेले मृतदेह, खिशात कुंकू; हादरलेल्या गावकऱ्यांना भलताच संशय
Nashik Crime: नाशिकमध्ये चाललंय काय? मध्यरात्री हत्येचा थरार, डोक्यात दगड घालून एकाला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com