Cloudburst in Ahilyanagar: नगरमध्ये ढगफुटी, तुडुंब भरलेल्या नदीत 5 जण अडकले; आपत्ती व्यवस्थापन पथकाने जिवाची बाजी लावून वाचवले, थरार कॅमेऱ्यात कैद|VIDEO

Heavy Rains Disrupt Life in Ahilyanagar: अहिल्यानगरला अवकाळी पावसाने झोडपले असून वाळकी, खडकी, खंडाळा, गुंडेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता यामुळे खडकी परिसरातील वालुंबा नदीत पाच जण अडकून पडले होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने थैमान घातले. वाळकी, खडकी, खंडाळा, गुंडेगाव या परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडकी परिसरातील वालुंबा नदीला अचानक मोठा पूर आल्याने पाच जण अडकून पडले होते. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तातडीने प्रशासनाला माहिती देण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि योग्य समन्वय साधत बचावकार्य राबवण्यात आले. अखेर या पाचही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com