Nevasa shocker — young man brutally beaten over old feud; fractures and eye damage reported, video goes viral. saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Young Man Brutally Beaten in Nevasa: एका तरुणाला जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणाच्या हातापायाला फ्रॅक्चर झाले असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav
  • नेवासा तालुक्यातील सोनई येथे तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय.

  • जुन्या वादातून मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.

  • जातीय वादातूनच तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.

सचिन बनसोड, प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथे एक मारहाणीच भयानक घटना घडलीय. जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. दरम्यान जातीय वादावरून तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मारहाण करणाऱ्यांविरोधाय अॅक्ट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन संजय वैरागर असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला जुन्या वादाच्या रागातून लाकडी दांड्याने जीवघेणी मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी नितीन याला बळजबरीने गाडीत बसवून अज्ञात स्थळी नेलं.संजय वैरागरला जातीयवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली, असा फिर्याद मारहाण झालेल्या तरुणाचे नातेवाईकांनी दिली आहे.

गंभीर जखमी झालेल्या नितीन वैरागर याच्यावर रूग्णालय उपचार सुरू असून जातीय मानसिकतेतून ही मारहाण झाल्याचे कुटुंबीयांनी म्हंटलय. याप्रकरणी संभाजी लांडे, संदीप लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्निल भळगट, हासणे आदींविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी ट्विट करत केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील आरएसएसच्या १५ ते २० गुंडानी गावातून उचलून नेऊन अज्ञात स्थळी अमानुषपने मारहाण केली. अत्यंत क्रूरपने पायावरून, हातांवरून मोटार सायकल घालून हात-पाय मोडले. त्याला जबर मारहाण करून डोळा निकामी केला.

आरोपींनी तर पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून अज्ञातस्थळी फेकून दिले. अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी ही घटना आहे. या पीडित तरुणाला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आज पीडित तरुण संजय वैरागर यांच्या वडिलांशी मी फोनवर बोललो. यातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची आमची मागणी आहे. लवकरच पीडित कुटुंबियांची मी भेट घेणार आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

SCROLL FOR NEXT