सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

Husband Kills Wife Over Affair With Stepmother: बिहारच्या गया जिल्ह्यातील सीढ गावात नवऱ्यानं बायकोला संपवलं. सावत्र आईसोबत प्रेमसंबंध असल्याचं उघड होताच नवऱ्यानं हे कृत्य केलं.
Husband Kills Wife Over Affair With Stepmother
Husband Kills Wife Over Affair With StepmotherSaam
Published On
Summary
  • सीढ गावात नवऱ्यानं बायकोची गोळी मारून हत्या केली.

  • मुलामुळे हत्येचे रहस्य पोलिसांसमोर उलगडले.

  • पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतलं.

बिहारच्या गया जिल्ह्यातील सीढ गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सावत्र आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पत्नीची गोळ्या घालून हत्या केली आहे. १० वर्षांच्या मुलाने वडिलांनी केलेल्या कृत्याचे पितळ उघड पाडले. वडिलांनी आईची पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या केली असल्याचं मुलानं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रीना देवी (वय वर्ष ३०) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. तर,श्याम ठाकूर असे आरोपी पतीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. वृत्तानुसार, आरोपी श्याम ठाकूर दुपारी २ वाजेच्या सुमारास पत्नीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने गयाजी येथे घेऊन गेला. रात्रीच्या सुमारास आरोपी पत्नीला बंधुबीघा-सीढ मार्गावर घेऊन गेला. त्या मार्गावर कुणीही नव्हते. आरोपीनं पिस्तूल काढून पत्नीची हत्या केली.

Husband Kills Wife Over Affair With Stepmother
दूध की रबर! उकळी फूटली अन् काही तासांत रबर झाला; VIDEO पाहून बसेल धक्का

सकाळी स्थानिकांना महिलेचा मृतदेह सापडला. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. डीएसपी सुरेंद्र कुमार सिंह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. मृत महिलेच्या मुलानं पोलिसांना सगळं सांगितलं. शुभमने पोलिसांना सांगितले की, 'वडिलांनी आठवड्याभरापूर्वी घरी एक पिस्तूल आणले होते. ज्याचा वापर आईच्या हत्येसाठी करण्यात आला'.

Husband Kills Wife Over Affair With Stepmother
लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच तपास करून आरोपी श्याम ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी श्याम ठाकूरचे त्याच्या सावत्र आईसोबत अवैध संबंध होते. त्याची पत्नी रीना देवीचा या नात्याला विरोध होते. श्यामने पत्नीचा काटा काढण्याचा ठरवले. त्यानं पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com