लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

President Droupadi Murmu’s Helicopter Landing Incident in Kerala: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात घडला. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होताच अपघात घडल्याची माहिती.
President Droupadi Murmu’s Helicopter Landing Incident in Kerala
President Droupadi Murmu’s Helicopter Landing Incident in KeralaSaam
Published On
Summary
  • थोडक्यात अपघात टळला!

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला अपघात.

  • नेमकं काय घडलं?

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान बुधवारी एक मोठा अपघात टळला. राष्ट्रपतींना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे एमआय- १७ हेलिकॉप्टर प्रमादम स्टेडियम (राजीव गांधी इनडोअर स्टेडियम)येथील हेलिपॅडवर उतरल्यावर, हेलिपॅडचा एक भाग अचानक खचला. यामुळे हेलिकॉप्टर खाली हेलिपॅडवर रूतला. हा अपघात राष्ट्रपती मुर्मू शबरीमला मंदिराला भेट देण्यापूर्वी घडला.

प्राथमिक माहितीनुसार, द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. तसेच हेलिकॉप्टरला रूतलेल्या भागातून सुरक्षितपणे बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही.

President Droupadi Murmu’s Helicopter Landing Incident in Kerala
ऐन दिवाळीत नागपुरमध्ये अग्नितांडव, जिओ मार्केटसह १० ठिकाणी आगीचा भडका; पाहा VIDEO

अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचे निलक्कल येथील लँडिंग खराब हवामानामुळे रद्द झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा प्रमादम येथे हेलिपॅड बांधण्यात आला. पर्यायी लँडिंग साइट म्हणून प्रमादमची निवड करण्यात आली होती. मात्र, लँडिंग केल्यानंतर अपघात घडला. सुदैवाने नुकसान झाले नाही.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, 'हेलिपॅडवर टाकलेले काँक्रीट पूर्णपणे सुकलेले नव्हते. हेलिकॉप्टरच्या वजनामुळे लँडिंग करताना पृष्ठभाग खाली रूतला. तसेच चाकाखाली खड्डे पडले'.

President Droupadi Murmu’s Helicopter Landing Incident in Kerala
मेडिकल स्टूडेंट गर्लफ्रेंडसोबत OYOमध्ये गेला, गोळ्या खाल्ल्या अन्.. संशयास्पद मृत्यूमागचं गूढ वाढलं

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २१ ऑक्टोबर रोजी तिरूवनंतपूरम, केरळमध्ये पोहोचल्या. त्या केरळमध्ये २४ ऑक्टोबरपर्यंत आहेत. बुधवारी राष्ट्रपती शबरीमाला मंदिराला भेट देतील. नंतर गुरूवारी तिरूवनंतपूरम येथील राजभवनात माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांच्या प्रतिमेचे अनावरण करतील. तसेच शिवगिरी मठ येथे श्री. नारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी समारोहाचे उद्घाटन करतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नंतर कोट्टायम जिल्ह्यातील पाला येथील सेंट थॉमस कॉलेजच्या ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या समारंभात सहभागी होतील. तसेच २४ ऑक्टोबररोजी एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी सोहळ्यात उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com