
नागपूर शहरात दिवाळीच्या रात्री १०हून अधिक ठिकाणी फटाक्यांमुळे आग.
जिओ स्मार्ट मार्केटमध्ये लागलेली आग मोठ्या प्रमाणावर होती.
शिर्डीतील साडीचे दुकानही मध्यरात्री जळून खाक.
काल सर्वत्र दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाचा माहौल होता. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या प्रियजन आणि कुटुंबियांसोबत फटाके फोडतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या फटाक्यांमुळे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आग लागली. १०हून अधिक भागांत आग लागल्याची माहिती आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे बरंच नुकसान झालं आहे.
नागपूर शहरातील जिओ स्मार्ट मार्केटमध्ये आग लागल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. जिओ मार्टमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच मनपाचे फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी लागली असल्याकारणाने वाढत गेली. रात्रभर ६ अग्निशामक बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, जिओ मार्टमध्ये आग कशी लागली. याची माहिती समोर आलेली नाही.
धूर निघत असल्याचं एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर आगीनं चांगलाच भडका घेतला. यासोबतच शहरातील इतर भागांमध्ये फटाकेसह कचऱ्याला आग लागल्याच्या घटनेची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे. साधारणपणे 10 पेक्षा जास्त घटना घडल्याचं मनपाचा फायर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
शिर्डीत साडीचे दुकान जळून खाक
शिर्डीत काल मध्यरात्री एका साडीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या साडीच्या दुकानाने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. आग इतकी मोठी होती की परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दलानं तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी दुकान जळून खाक झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.