तिशीतच हाडं ठिसूळ? गुडघे, सांधे ठणतात? खा घरगुती ४ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात..

Expert Tips to Improve Bone Health: हिवाळ्यात हाडांचा त्रास वाढतो. यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा. हाडं होतील मजबूत.
Expert Tips to Improve Bone Health
Expert Tips to Improve Bone HealthSaam
Published On
Summary
  • हिवाळ्यात हाडांची दुखणी वाढतात.

  • ऑस्टियोपोरोसिस अन् फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

  • आहारात ४ पदार्थांचा समावेश करा.

तापमानात घट झाल्यावर थंडीचा पारा वाढतो. हिवाळा अनेक जुनाट समस्या आणि वेदना परत आणतो. यामुळे हाडांचे दुखणे वाढते. शिवाय खराब जीवनशैली आणि योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. हाडं देखील कमकुवत होतात. अशावेळी ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. म्हणून, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खाणे अत्यंत महत्वाचे आहे.

तामिळनाडूचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कार्तिक दयालन यांनी हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. हाडांची ताकद वाढवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा. डॉ. कार्तिक दयालन यांच्या मते, हिवाळ्यात शरीराची थंडी सहन करण्याची क्षमता कमी होते. परिणामी गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास होतो. तसेच संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिसचाही त्रास उद्भवतो.

Expert Tips to Improve Bone Health
पुण्यातील IT हब हादरलं, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या मुलावर प्राणघातक हल्ला, तडीपार गुंडांचा हैदोस

हाडे मजबूत करणारे पदार्थ

मशरूम

मशरूम हाडांसाठी फायदेशीर ठरते. ते व्हिटॅमिन डीचा एक उत्तम स्त्रोत आहे.

डाळी

ओट्स, क्विनोआ आणि डाळींचा आहारात समावेश करा. हिवाळ्यात हाडांचे आरोग्य राखण्यासाठी हे पदार्थ मदत करतात. विविध डाळी खा. हाडं मजबूत करण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या

हिवाळ्यात विविध आजारांचा धोका टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा. त्यात पौष्टिक घटक असतात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत मानले जाते. जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Expert Tips to Improve Bone Health
'त्यांनी माझा हात पकडून मला..', गोविंदाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाली?

हिवाळ्यात हाडांचे दुखणे टाळण्यासाठी काय करावे?

हलका व्यायाम

हिवाळ्यात हलका व्यायाम करून सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

कोमट पाण्यानं शरीर शेकून घ्या

हिवाळ्यात हाडांचं दुखणं वाढतं. त्यामुळे गरम पाण्याने स्नान करा. किंवा गरम पाण्याने शरीर शेकून घ्या.

सुर्यप्रकाश घ्या

उन्हात थोडा वेळ बसा. शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल.

आहाराची काळजी घ्या

हिवाळ्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थ खा. यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com