दूध की रबर! उकळी फूटली अन् काही तासांत रबर झाला; VIDEO पाहून बसेल धक्का

Dhule Fake Milk Scandal: धुळ्याच्या शिरपूर येथील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध उकळल्यानंतर रबरासारखे झाल्याची घटना समोर आली आहे.
Dhule Fake Milk Scandal
Dhule Fake Milk ScandalSaam
Published On
Summary
  • धुळ्यातून भेसळयुक्त दूध विक्रीचा प्रकार समोर.

  • उकळल्यावर दूध रबरासारखे झाले.

  • भेसळीचा व्हिडिओ व्हायरल.

उत्तम आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो. दूध प्यायल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात. पण भेसळयुक्त दूध प्यायल्यानं तब्येत बिघडूही शकते. धुळ्यातून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. भेसळयुक्त दुधाच्या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासांतच खराब झाले. विशेष म्हणजे हे दूध रबरासारखे झाले आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिरपूर येथील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासांतच खराब झाले.

Dhule Fake Milk Scandal
'..तो जवळ आला अन् स्पर्श करून..' मराठी अभिनेत्रीनं सांगितला वाईट अनुभव, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे हेच दूध उकळल्यावर ते अक्षरश: रबरासारखे झाले असल्याचं संबंधित महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच संबंधित दूध विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Dhule Fake Milk Scandal
भररस्त्यावर अग्नीतांडव! ७० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, दिवाळीसाठी गावाला निघाले पण....

या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवाळी या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर दूध विक्री होत असताना, अशा प्रकारे भेसळयुक्त दूध विकले जात असेल तर, अन्न व औषध प्रशासन विभाग काय करत आहे, असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com