भररस्त्यावर अग्नीतांडव! ७० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, दिवाळीसाठी गावाला निघाले पण....

Double-Decker Bus Catches Fire Panic Among 70 Passengers: उत्तरप्रदेशातील लखीमपूरमधील चौकात डबल डेकर बसला आग लागली. सुदैवाने जीवितहानी टळली.
Double-Decker Bus Catches Fire Panic Among 70 Passengers
Double-Decker Bus Catches Fire Panic Among 70 PassengersSaam
Published On
Summary
  • मैगलगंज चौकात डबल डेकर बसला आग.

  • बसमध्ये ७० प्रवासी असल्याची माहिती.

  • शॉक सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर मैगलगंजच्या मुख्य चौकात भीषण अपघाताची घटना घडली. डबल डेकर बसने अचानक पेट घेतला. या भीषण आगीत डबल डेकर जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. पण काही प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस दिल्लीहून सीतापूरच्या दिशेनं जात होती. याचदरम्यान, डबल डेकर बसने पेट घेतला. या बसमधून ७० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. सर्व प्रवाशांना वेळेत बसबाहेर काढण्यात आले. काही प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डबल डेकर बस दिल्लीहून सीतापूरच्या दिशेनं जात होती. लखीमपूर येथील मगलगंज चौकात बस काही वेळ थांबली होती. प्रवासी अल्पोपहार करण्यासाठी थांबली होती. तेव्हा अचानक बसच्या मागून धूर येऊ लागला. काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रवाशांना मदत केली. सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढली.

Double-Decker Bus Catches Fire Panic Among 70 Passengers
ऐन दिवाळीत नागपुरमध्ये अग्नितांडव, जिओ मार्केटसह १० ठिकाणी आगीचा भडका; पाहा VIDEO

बचावकार्य सुरू असताना काही प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे जवान येण्याआधीच दीड तासानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.

Double-Decker Bus Catches Fire Panic Among 70 Passengers
लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

प्राथमिक अंदाजानुसार, आगीचे कारण शॉर्ट सर्किट किंवा फटाके असू शकते. दरम्यान, बसमध्ये पेट्रोमॅक्स सिलिंडर देखील आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारवाईला सुरूवात केली आहे. निरीक्षक रविंद्र पांडे यांनी सांगितले की, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com