'..तो जवळ आला अन् स्पर्श करून..' मराठी अभिनेत्रीनं सांगितला वाईट अनुभव, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Paru fame Sharayu Sonawane narrates real-life self-defense story: शरयू सोनवणेनं मुलाखतीत भूतकाळातील वाईट अनुभवाबाबत माहिती दिली. मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.
Paru fame Sharayu Sonawane narrates real-life self-defense story
Paru fame Sharayu Sonawane narrates real-life self-defense storySaam
Published On

झी मराठीवरील पारू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं आयु्ष्यातील वाईट अनुभव शेअर केला आहे. या वाईट अनुभवातून अभिनेत्रीनं कोणता ध़डा घेतला? वडिलांनी कोणती शिकवण दिली? या बद्दलही तिनं माहिती दिली. शरयूचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

शरयु सोनवणे सध्या झी मराठीवरील पारू या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे अभिनेत्री प्रकाशझोतात. सध्या तिचा मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत शरयुनं आपला अनुभव शेअर केला आहे.

Paru fame Sharayu Sonawane narrates real-life self-defense story
लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

शरयु म्हणाली, 'माझे वडील पोलीस आहेत. त्यांनी आजतागायत बऱ्याच शिकवणी दिल्या आहेत. लहानपणापासून कुणाचं ऐकून घ्यायचं नाही. मारायचं.. अशी त्यांनी शिकवण दिली होती. माझ्याकडे जर कुणी वाईट नजरेनं पाहत असेल तर, माझा भाऊ सरळ मारायला जातो. खरंतर असं प्रत्येकाला करता आलं पाहिजे', असं शरयू म्हणाले.

Paru fame Sharayu Sonawane narrates real-life self-defense story
भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

'मी आणि माझी आई एकत्र चर्चगेट स्टेशनजवळ गेलो होतो. रात्री ८ची वेळ होती. तेव्हा रस्त्यावरून जात असताना एका माणसाने अतिशय वाईट पद्धतीनं धक्का दिला. त्यानं मला हातही लावला. त्याचा स्पर्श विचित्र होता. माझी आई पुढे चालत होती. त्यामुळे तिला याबाबत माहित नव्हतं. नंतर मी त्या माणसाच्या मागे धावत गेली. मी त्याला मारलं. तसेच पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी असल्या गोष्टी अजिबात सहन करत नाही', असं शरयू म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com