Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

Tragic Incident in Panvel: जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जणांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न;  एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना
Published On
Summary
  • जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • चहामध्ये विषारी द्रव्य टाकून आत्महत्येचा प्रयत्न

  • या घटनेत एका पुरुषाचा मृत्यू, चौघांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पनवेल तालुक्यामधील जावळे गावामध्ये एका खोलीत राहणाऱ्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाचजणांपैकी एकाचा मृत्यू झालाय. इतरांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न;  एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना
Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेतील एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे, पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न;  एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना
सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

मूळचे नेपाळी असणारे हे एकाच कुटूंबातील सदस्य जावळे गावात अनेक दिवसांपासून राहत होते. गेल्या दोन ते तीन दिवसापासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने त्यांच्या शेजारच्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अखेर सूरक्षा यंत्रणेच्या जवानांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पाचही जण आढळले.

उपचारासाठी या सर्वांना पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर यामधील २२ वर्षीय संतोष बिरा लूहार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तसेच बेशुद्ध व्यक्तींमध्ये २३ वर्षीय रमेश बिरा लोहार, त्यांची पत्नी बसंती व पाच वर्षांचा मुलगा आयुष आणि दोन वर्षांचा आर्यन हे सुद्धा बेशुद्ध असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागाची गरज असल्याने या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याची पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com