Ahilyanagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: आई-वडिलांनीच घेतला ३ महिन्यांच्या 'शिवांश'चा जीव, मृतदेह पुलाखाली फेकला; धक्कादायक कारण समोर

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये एका ३ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पुलाखाली सापडला होता. या मुलाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांनीच या मुलाला संपवल्याचे तपासातून उघड झाले आहे.

Priya More

Summary -

  • अहिल्यानगरमध्ये ३ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती

  • या मुलाची हत्या आई-वडिलांनी केल्याचे तपासातून उघड

  • मुळा नदीवरील पुलाखाली बाळाचा मृतदेह आढळला होता

  • मुलगा आजारी असल्याने त्यांनी त्याची हत्या केल्याची कबुली दिली

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये एका नदीच्या पुलाखाली ३ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलाची हत्या तिच्याच आई-वडिलांनी केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. आई-वडिलांनीच पोटच्या मुलाचा जीव घेत त्याचा मृतदेह नदीच्या पुलाखाली टाकला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात ४ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. मुळा नदीच्या पुलाखाली एका ३ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. वडिलांनीच आपल्या मुलाची हत्या केली. त्यानंतर मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, ४ डिसेंबर रोजी मुळा नदीकडे गेलेल्या काही लोकांना पुलाखाली चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि घारगाव पोलिस घटनेचा समांतर तपास करत असताना या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार ही जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले.

पोलिसांनी गावात जावून सखोल माहिती घेतली असता चिमुकल्याच्या आई वडिलांवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मुलाचे वडील प्रकाश पंडित जाधव, आई कविता प्रकाश जाधव आणि गाडी चालक हरिदास गणेश राठोड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चिमुकल्या शिवांशचा खून केल्याचे सांगितले.

आजाराने ग्रस्त असलेला शिवांश बरा होणार नसल्यामुळे गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात नदीच्या पुलाखाली त्याचा मृतदेह फेकून दिल्याची कबुली आई वडिलांनी दिली. या घटनेमुळे पोलिसही चक्रावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली

रूळावर महिलेचा मृतदेह; संतप्त जमावाचा २ पोलिसांवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय?

Protein shake cancer risk: वर्कआउटसाठी घेत असलेला प्रोटीन शेक ठरतोय जीवघेणा? कॅन्सरचा धोका असल्याचा तज्ज्ञांकडून खुलासा

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Cheapest Gold: जगामध्ये सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळते?

SCROLL FOR NEXT