Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास

Engineering Student Ends Life: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये इंजिनिअरिंगच्या विदयार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. हॉटेलच्या खोलीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली.
Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास
Engineering Student Ends Life Saam Tv
Published On

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

  • ग्रेटर नोएडा येथे विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत घेतला गळफास

  • विद्यार्थ्याच्या खोलीत सुसाईड नोट मिळाली असून त्यात मी हार मानतो असे लिहिले

  • झारखंडचा रहिवासी असलेला कृष्णकांत मानसिक तणावात होता

उत्तर प्रदेशमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथील ग्रेटर नोएडा येथे ही घटना घडली. नोएडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये एमसीएच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वसतिगृहाच्या खोलीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने वसतिगृहातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

नॉलेज पार्क पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सर्वेश कुमार सिंह यांनी सांगितले की, कृष्णकांत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव होते. या विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. कृष्णकांत हा झारखंडचा रहिवासी होता आणि त्याच्या रूममेट ऋतिकसोबत क्राउन हॉस्टेलमध्ये राहत होता. पोलिसांना खोलीत एक छोटी सुसाईड नोट सापडली ज्यावर लिहिले होते, 'मी हार मानतो. माझे शरीर आणि माझे सर्व सामान माझ्या कुटुंबाला द्या.' पोलिस सध्या तपास करत आहेत.

Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास
Shocking: राजकारणात खळबळ! बड्या राजकीय नेत्याची हत्या, छातीत झाडल्या ३ गोळ्या

पोलिसांनी पुढे सांगितले की, घटनेच्या काही काळापूर्वी कृष्णकांतने त्याच्या वडिलांशी फोनवर बोलणे केले होते. फोनवर बोलताना त्याच्या वडिलांना भीती होती की तो स्वतःला हानी पोहोचवण्यासारखे पाऊल उचलू शकतो. काळजीत असलेल्या वडिलांनी ताबडतोब त्याच्या रूममेट हृतिकशी संपर्क साधला आणि त्याला कृष्णकांतची त्वरित चौकशी करण्यास सांगितले.

Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास
Shocking: महिला न्यूज अँकरची ऑफिसमध्येच आत्महत्या, १० दिवसांवर होतं लग्न; त्याआधीच आयुष्य संपवलं

कृष्णकांतने आत्महत्या केली त्यावेळी त्याचा मित्र ऋतिक वसतिगृहात नव्हता. म्हणून त्याने एका ओळखीच्या व्यक्तीला त्याच्या खोलीत जाण्यास सांगितले. जेव्हा तो मित्र आला तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद दिसला. बराच वेळ ठोठावून आणि ओरडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला तेव्हा कृष्णकांत लटकलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास
Shocking : राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

ऋतिकने पोलिसांना सांगितले की, कृष्णकांतला काही काळापासून सतत डोकेदुखीचा त्रास होत होता. ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचलेला आणि तणावात दिसत होता. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल. पोलिसांनी संस्था प्रशासनाशीही बोलणी सुरू केली आहेत आणि विद्यार्थ्याच्या अभ्यासाबाबत, आरोग्याबाबत आणि वैयक्तिक परिस्थितीबाबत तपशील गोळा करत आहेत. कृष्णकांतच्या कुटुंबाला घटनेबद्दल कळवण्यात आले आहे आणि ते आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास
Shocking : "तू कुठेतरी जाऊन मर..." पत्नीच्या अपमानाला कंटाळून पतीने केली हत्या; कुऱ्हाड उचलली अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com