Shocking : राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

pandharpur Shocking news : पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने लोंढे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
pandharpur news
pandharpur Shocking newsSaam tv
Published On
Summary

सोलापुरातील पंढरपूरमधील कोर्टी गावात शेततळ्यात बुडून पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू

मृत्यू पावलेले तिघे लोंढे कुटुंबातील सदस्य

कुटुंब मूळचे मंगळवेढा येथील असल्याची माहिती हाती आली आहे

तिघांच्या मृत्यूने गावात आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली

सोलापुरातील पंढरपुरात सोमवारी भीषण दुर्घटना घडली आहे. पंढरपुरातील शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातील घटना घडली आहे. तिघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

pandharpur news
मराठ्यांचं वादळ आता दिल्लीला धडकणार; मनोज जरांगे महायुती सरकारचं टेन्शन वाढवणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या पंढरपुरातील कोर्टी गावातील लोंढे कुटुंबासोबत भयंकर घटना घडली.कोर्टीत शेततळ्यात बुडून लोंढे पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला. विजय राजकुमार लोंढे (वय 30), प्रियांका विजय लोंढे (वय 28), प्रज्वल विजय लोंढे (वय 5) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी आहेत.

स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर तळ्यात बुडलेल्या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली की आत्महत्या या बाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. लोंढे कुटुंबिय या परिसरात का आले होते. याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील,वीरसेन पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहाणी केली.

pandharpur news
खळबळजनक! बायको हॉस्पिटलमध्ये बेडवर, नवरा अचानक रुममध्ये शिरला, क्षणात भयंकर घडलं

धुळ्यात दोन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू

धुळ्यात साक्री तालुक्यातील गणेशपुर दुर्घटनेतील विहिरीत बुडालेल्या दुसऱ्या चिमुकलीचा मृतदेह शोधण्यास तब्बल 24 तास उलटल्यानंतर तपास यंत्रणेला यश मिळालं. कांद्याने भरलेला ट्रॅक्टर विहिरीत बुडून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत दोन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक चिमुकली या दुर्घटनेमध्ये बचावली आहे. या दुर्घटनेमध्ये दोघा चिमुकलींचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com