RAHATA OMKAR GAIKWAD DEATH CASE: 13 YEAR OLD BOY DIES AFTER CAR ACCIDENT, 3 ACCUSED ARRESTED Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : आजीसोबत बाहेर निघाला, वाटेत काळाचा घाला, कारच्या धडकेत नातवाचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात

Ahilyanagar Rahta Accident News : अहिल्यानगरच्या राहाता शहरात १३ वर्षीय ओमकार गायकवाडचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. चालकाने मुद्दाम कार रिव्हर्स घेऊन अंगावर घातल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • राहाता येथे 13 वर्षीय ओमकार गायकवाडचा कारच्या धडकेत मृत्यू

  • चालकाने अपघातानंतर पुन्हा कार रिव्हर्स घेतल्याचा आरोप

  • संतप्त नागरिकांनी राहाता पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले

  • पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

अहिल्यानगरच्या राहता शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. आजीसोबत आनंदाने डफचा खेळ पाहण्यासाठी निघालेल्या 13 वर्षीय ओमकार गायकवाडचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हा केवळ अपघात नसून, चालकाने जाणीवपूर्वक कार पुन्हा रिव्हर्स घेऊन ओमकारच्या अंगावर घातल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर राहाता शहरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून १ जण फरार आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ओमकार आपल्या आजीसोबत राहाता शहरातील शनी चौक परिसरात डफचा खेळ पाहण्यासाठी जात होता. कृष्ण मंदिराजवळील वळणावर अचानक भरधाव वेगाने आलेल्या इटिंगा कारने आधी आजीला आणि नंतर ओमकारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ओमकार रस्त्यावर कोसळला. प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबियांच्या दाव्यानुसार, ओमकार खाली पडल्यानंतर कार चालकाने माणुसकीला काळिमा फासत गाडी पुन्हा मागे पुढे घेऊन त्याच्या पोटावरून चाक फिरवले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओमकारला तातडीने शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच काल सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. ओमकारच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी ओमकारचा मृतदेह थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या आंदोलन केले. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी राहाता येथे दाखल झाले. त्यानंतर तपासाला वेग देत पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शोकाकुल वातावरणात ओमकारवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Maharashtra : भरती-ओहोटीच्या लाटांवर उभा असलेला 'हा' किल्ला पाहिलाय का? एकदा नक्की भेट द्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर राहणार

'जय श्री राम'च्या घोषणा बंद करा, भाजप मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केलं शांत; सुवेंदू अधिकारी असे का म्हणाले?

Weather News : राज्यात उष्णेतच्या लाटेचा 'यलो अलर्ट, मुंबईसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढणार; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT