Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

Shreya Maskar

माहिम किल्ला

माहिम किल्ला हा माहिम खाडीच्या काठावर स्थित एक ऐतिहासिक टेहळणी बुरूज आहे. हे ठिकाण वरळीपासून हाकेच्या अंतरावर आहे.

Mahim Fort | google

जुने नाव काय?

ऐतिहासिकदृष्ट्या माहिम किल्ल्याला 'माहीकावती' किंवा 'महाकावती' म्हणून ओळखले जात असे. हे नाव संस्कृत शब्दापासून आले आहे.

What is the old name? | google

किल्ला कोणी बांधला?

माहिम किल्ल्याचा प्रदेश १३ व्या शतकातील राजा बिंबदेव यांच्या राज्याची राजधानीही होता. या किल्ल्याची मूळ रचना ११४० ईसवी सनमध्ये राजा प्रतापबिंब यांनी केली होती.

Who built the fort? | google

इतिहास

शतकानुशतके, किल्ला गुजराती सल्तनत, पोर्तुगीज आणि ब्रिटीश यांच्याकडून तीव्रपणे लढला गेला आणि नियंत्रित झाला. माहिमचा किल्ला बांधण्याचा मुख्य हेतू माहिमच्या खाडीचे रक्षण करणे आणि जलमार्गावर नियंत्रण ठेवणे हा होता.

History | google

कसं जाल?

वेस्टर्न लाइनवरू लोकल ट्रेन पकडून तुम्ही 'माहिम जंक्शन' या स्टेशनला उतरा. तेथून पुढे रिक्षाने तुम्ही माहिम किल्ल्यावर पोहचाल.

how do you go | google

मराठा साम्राज्य

माहिम किल्ला १७३९ मध्ये मराठा सैन्याने हा किल्ला यशस्वीपणे जिंकून घेतला होता. माहिम किल्ला मुंबईतील सर्वात जुने आणि महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.

Maratha Empire | google

निसर्ग सौंदर्य

माहिम किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सी-लिंकचे निसर्गरम्य दृश्य दिसते. वीकेंडला तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Haunted Fort | saam tv
येथे क्लिक करा...