Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Shreya Maskar

भारतील भयानक किल्ले

भारतात असे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत जे गूढ लोककथा, भूताच्या दंतकथांनी वेढलेले आहेत. सर्वाधिक प्रसिद्ध ६ भयानक किल्ले जाणून घेऊयात. येथे जाताना १०० वेळा विचार करा.

forts in India | google

भानगड किल्ला -राजस्थान

भानगड किल्ला भारतातील सर्वाधिक भुताटकीचा अनुभव देणारा (Haunted) किल्ला मानला जातो. येथे सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे.

Bhangarh Fort | google

शनिवारवाडा - पुणे

१७३२ मध्ये बांधलेला शनिवारवाडा किल्ल्यात पेशवे नारायणराव यांची क्रूर हत्या करण्यात आली. पौर्णिमेच्या रात्री त्यांच्या भयावह किंकाळ्यांचे प्रतिध्वनी आजही ऐकू येतात, असा दावा स्थानिक लोक आणि पर्यटक करतात.

Shaniwarwada | google

चित्तोरगड किल्ला - राणा कुंभा महाल - राजस्थान

चित्तौडगड किल्ल्याच्या आत राणा कुंभा महाल आहे. येथे राणी पद्मिनी आणि हजाराहून अधिक स्त्रियांनी जौहर (आत्मदाह) केला. येथे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात असे स्थानिक लोक बोलतात.

Chittorgarh Fort | google

मेहरानगड किल्ला - जोधपूर

मेहरानगड किल्ला खडकाळ कड्यावर वसलेला आहे. हा भव्य किल्ला एका तपस्वीच्या आत्म्यामुळे पछाडलेला असल्याचे मानले जाते.

Mehrangarh Fort | google

झाशीचा किल्ला - उत्तर प्रदेश

१८५७ च्या उठावाच्या काळात झाशीचा किल्ल्यावर अनेक लढाया झाल्या. स्थानिक लोक आणि पर्यटकांचा असा विश्वास आहे की, युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे आत्मे आजही या परिसरात गस्त घालतात. तसेच, रात्रीच्या वेळी घोड्यांच्या धावण्याचा भयानक आवाज ऐकू आल्याचा दावाही काही लोक करतात.

Jhansi Fort | google

गोलकोंडा किल्ला - तेलंगणा

गोलकोंडा किल्ला हा देखील खूप भयानक मानला जातो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार, येथे कुजबुजण्याचे आवाज ऐकू येतात. संध्याकाळी येथे जाण्यास लोक घाबरतात.

Golconda Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : कास पठाराजवळील 'हे' मनमोहक ठिकाण माहितीये का? पावसाळ्यात खुलतं स्वर्गीय सौंदर्य

Satara Tourism | saam tv
येथे क्लिक करा...