Surabhi Jayashree Jagdish
रविवारची सुट्टी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायची असेल तर पुण्याजवळील किल्ले ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. नव्या ट्रेकर्सनाही सहज चढता येतील असे अनेक किल्ले पुण्याच्या आसपास आहेत. या किल्ल्यांवरून सह्याद्रीचं सुंदर दृश्य, ऐतिहासिक वास्तू आणि गारवा अनुभवता येते.
किल्ल्यांवरील ट्रेकिंगमुळे शरीराचा व्यायाम होतो आणि मनालाही ताजेतवाने वाटते. सह्याद्रीतील किल्ले इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम दाखवतात. आठवड्याच्या सुट्टीत कमी खर्चात चांगला अनुभव घेण्यासाठी किल्ले ट्रेकिंग हा उत्तम पर्याय आहे.
ट्रेकला जाताना चांगली ग्रिप असलेले शूज वापरणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी, हलकं खाणे आणि रेनकोट किंवा टोपी सोबत ठेवावी. सकाळी लवकर सुरुवात केल्यास गर्दी आणि उन्हाचा त्रास कमी होतो.
लोहगड हा पुण्यापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असून नवीन ट्रेकर्ससाठी सर्वात सोपा किल्ला मानला जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आणि स्पष्ट मार्ग असल्यामुळे चढाई तुलनेने सुरक्षित असते.
तिकोना किल्ला पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर पवना धरण परिसरात आहे. त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव आहे. साधारण एका तासाच्या चढाईनंतर किल्ल्यावर पोहोचता येतं.
सिंहगड हा पुण्याजवळील सर्वात लोकप्रिय आणि सहज पोहोचता येणारा किल्ला आहे. पुण्यापासून सुमारे ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी स्पष्ट आणि दगडी मार्ग उपलब्ध आहे.
सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत ट्रेकची सुरुवात केल्यास हवामान चांगलं मिळू शकतं. प्रत्येक किल्ला एका दिवसात आरामात पाहून पुन्हा पुण्यात परतता येतं.