Agriculture News Saam Tv
महाराष्ट्र

Agriculture News: शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? हवामान तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Monsoon Update: राज्यात मान्सूनने यावर्षी वेळेआधीच आगमन केलं. पण मान्सून जेवढ्या वेगात दाखल झाला पण आता तो मंदावला आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करावी की नाही? असा प्रश्न पडला आहे.

Priya More

मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा लवकरच दाखल झाला. मान्सून वेगाने दाखल झाला खरा पण आता त्याने विश्रांती घेतली आहे. सध्या राज्यात मान्सून मंदावला असून काहीच ठिकाणी पाऊस पडत आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वी राज्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलं त्यामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं. आता शेतकऱ्यांना पुढचं नियोजन करायचे आहे त्याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

१ जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे. चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे. राज्यातल्या हवामान खात्याने १० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे. दुसरीकडे पंजाबराव डख यांनी एक इंच ओलावा असलेली जमिनी पेरणीसाठी पोषक असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १ जूनपासून ते ६ जूनपर्यंत सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्ट्यात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र ६ जूनपर्यंत जर जमिनीत वापसा असेल तर शेतीची कामे करून घ्यावी. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील, असा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकामी जीवितहानी झाली तर काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले. असामध्ये पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. यावर हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी सल्ला दिला की, 'पंचनामे कशामुळे करायचे तर अनेक ठिकाणी विजा पडल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान, घराचं नुकसान झाले यामुळे याठिकाणी पंचनामे करावेत.'

तसंच, 'दरवर्षी मुंबईतून मान्सून येतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस कमी पडतो. मात्र यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मग मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुष्काळ पट्ट्यातील जिल्ह्यांसाठीही यंदा आनंदाची बातमी असणार आहे. जूनमध्ये अनेक बंधारे भरून जातील.', असं देखील पंजाबराव डख यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT