Maharashtra Rain : मान्सूननं पळवलं तोंडचं पाणी! वेळेआधीच धडकला, आता स्पीड ब्रेकर लागला; बळीराजाची आकाशाकडे नजर

Maharashtra Rain Update : वेगानं आलेला मान्सून जुन महिन्याच्या आधीच गायब झालाय... मात्र मान्सूनने का दडी मारलीय? त्याची कारणं काय आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updatex
Published On

यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आणि सगळ्याच यंत्रणांची दाणादाण उडाली..मात्र वेळेआधीच धडकलेला मान्सून जूनच्या पंधरवड्यात दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय...

Maharashtra Rain Update
Pratap Sarnaik : भैयांच्या मतांसाठी 'मुंबईची बोलीभाषा हिंदी', शिंदेंच्या मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

यंदा मान्सूनने अंदमान निकोबार, केरळ, कर्नाटक ते महाराष्ट्र असा प्रवास करुन नवा विक्रम रचला.. मान्सून राज्यात दहा दिवस अगोदर दाखल झालाय. जूनमध्ये पोहचणारा मान्सून मे च्या 25 तारखेलाच पोहचल्यानं यंत्रणांची धांदल उडाली.. मात्र मान्सूनने दक्षिण भारतासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, ईशान्यकडील राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनची आगेकूच सुरु आहे.. मात्र आता मान्सून मान्सूनचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालंय... मात्र जूनमध्ये मान्सून दडी मारण्याची काय कारणं आहेत? पाहूयात....

मान्सून का दडी मारणार?

- वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा मान्सूनला फटका

- वायव्य भागातील वादळी वाऱ्यामुळे मान्सूनचा वेग मंदावणार

- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं फटका

Maharashtra Rain Update
Qualifier 2 खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स बाहेर पडेल, पंजाबला होणार मोठा फायदा; कारण...

मान्सून वेळेपुर्वी दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या हालचाली सुरु केल्या होत्या.. मात्र आता पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.. तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन कृषि विभागानं केलंय.. त्यामुळं आता मान्सून खरंच दडी मारणार की हवामान खात्यांच्या अंदाजाला ठेंगा दाखवत पुन्हा जोरदार बरसणार? याकडे राज्यातील दीड कोटी बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांचंही लक्ष लागंलय..

Maharashtra Rain Update
Jasprit Bumrah : मी तर चाल्लोय... महत्त्वाच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहचं धक्कादायक वक्तव्य, चाहत्यांचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com