Monsoon Update: राज्यात पावसाचा कहर, मुंबई, बारामतीमध्ये भयानक स्थिती; मान्सून यावर्षी वेळेआधी कसा आला?

Monsoon Arrival In India: भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यावर्षी मान्सूनही लवकर आला आहे. शेवटी, मान्सून लवकर येण्यामागील कारण काय आहे?
Monsoon Update: राज्यात पावसाचा कहर, मुंबई, बारामतीमध्ये भयानक स्थिती; मान्सून यावर्षी वेळेआधी कसा आला?
Published On

राज्यात पावसानं कहर केलाय. मु्ंबई, पुणे, सातारा, बारामती आणि इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी झालीय. पुणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपलंय. तर मुंबईला परत एकदा वरूणराजानं तुंबई केलंय. पण नेहमी विलंब करणारा मान्सून यंदा वेळेआधीच कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मान्सूनचं वेळेआधी आगमन कसं झालं याचं उत्तर हवामान विभागानं दिलंय.

Monsoon Update: राज्यात पावसाचा कहर, मुंबई, बारामतीमध्ये भयानक स्थिती; मान्सून यावर्षी वेळेआधी कसा आला?
Mumbai Rain: मुंबईची दैना! विमान आणि रेल्वे सेवा ठप्प, मेट्रो स्टेशनमध्ये पाणी तुंबलं; पावसाने मोडला 107 वर्षांचा रेकॉर्ड

मे महिन्यात उन्हाचे चटके बसत होते. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत होती. जूनशिवाय गारवा मिळणार नाही असं वाटत होतं. पण मे महिना संपण्याआधीच भारतातील अनेक भागात वादळ आणि पाऊसाने हजेरी लावली. मान्सूननं वेळेआधीच एंट्री घेतल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. हवामान विभागानुसार, यावर्षी मान्सून त्याच्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजे २४ मे २०२५ रोजी, १ जूनच्या ८ दिवस आधी केरळमध्ये पोहोचला.

केरळमध्ये पोहचला मान्सून

'टीओआय'च्या वृत्तानुसार, हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ नीता के गोपाल म्हणाल्या की, सुरुवातीचा मान्सून केवळ केरळवरच नव्हे तर लक्षद्वीप, दक्षिण अरबी समुद्र, पश्चिम-मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग आणि कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागातही पोहोचलाय. मालदीव, तामिळनाडूच्या काही भागात आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरासह नैऋत्य, मिझोरमचा काही भाग आणि उत्तर बंगालच्या उपसागरात देखील मान्सून पोहोचलाय. पुढील २-३ दिवसांत ते मध्य अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक आणि ईशान्य राज्यांसह महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात पोहोचेल.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित झालं. एक ट्रफ लाइन देखील आहे, जी विदर्भापर्यंत विस्तारलेलीय. या प्रणालीमुळे आर्द्रतेचा प्रवाह आणि वातावरणीय संवहन लक्षणीयरीत्या वाढलंय. ज्यामुळे भारतीय उपखंडात मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात मान्सूनचे आगमन १३ मे रोजी झाले. जे २१ मे या सामान्य तारखेपेक्षा खूप लवकर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com