MNS leader Sandeep Deshpande meets Shinde Sena’s Uday Samant after Raj Thackeray’s meeting with Devendra Fadnavis at Taj Hotel, Bandra. Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मुख्यमंत्री-राज ठाकरेंच्या भेटीनंतर चक्रं फिरली, मनसे नेत्यानं घेतली शिंदेंसेनेच्या महत्त्वाच्या शिलेदाराची भेट

MNS-Sena alliance : राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये अचानक तासभर चर्चा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात हलचल निर्माण झाली आहे. या भेटीनंतर लगेचच मनसेचे नेते संदीप देशपांडे हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचले.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray, Devendra Fadnavis meet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर चक्रं वेगात फिरल्याचे दिसतेय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उदय सामंत यांना भेटण्यासाठी गेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून याआधीच राज ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आता संदीप देशपांडे आणि सामंत यांच्या भेटीने महाराष्ट्रातील राजकारण फिरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. युती आणि आघाडीने आपली जुळवाजुळव सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. पण आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अचानक तासभराची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता. पण सकाळी अचानक वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली? हे समजलं नाही. पण या भेटीनंतर संदीप देशपांडे हे उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण फिरल्याची चर्चा होत आहे.

राज्यात नवी युती होणार का?

संदीप देशपांडे आणि एकनाथ शिंदे यांची भेट उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर झाली. दोन्ही भेटी योगायोगाने झाल्या, युतीबाबत आमची कोणताही चर्चा झाली नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सामंत यांनी युतीसंदर्भातील चर्चा फेटाळून लावली असली तरी फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकारण फिरण्याची शक्यता आहे. काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे यांची मुंबई आणि नाशिकमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीकडून जोर लावला जात आहे.

उदय सामंत काय म्हणाले ?

आजच्या भेटीमुळे विरोधाकांना मिरच्या लागतील. अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आले होते. फडणवीस-राज ठाकरे आणि आज झालेली आमची भेट, आशा दोन्ही बैठका योगायोगाने एकाच वेळी आल्या. आमची भेट ही विकास कामा संदर्भातील होती. युतीसोबतचे चर्चेचे अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. राज ठाकरे युतीसोबत आल्यास फायदा होईल. मनसेच्या युतीच्या प्रवेशाबाबतचा निर्णय अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

SCROLL FOR NEXT