Kamal Kaur : सोशल मिडिया स्टारचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Instagram influencer Kamal Kaur : कमल कौर ऊर्फ कंचन कुमारी हिचा मृतदेह कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला आहे. कमलचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत बंद कारमध्ये आढळून आला असून पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे.
Instagram influencer Kamal Kaur death case
Instagram influencer Kamal Kaur found dead in a locked car in Bathinda; police suspect foul play.
Published On

Kamal Kaur Bhabhi Death Case : सोशल मिडिया स्टार कमल कौर उर्फ कंचन कुमारी हिचा संशयास्पद मृत्य झाला आहे. कमलचा मृतदेह रूग्णालयाच्या पार्किंगमध्ये एका कारमध्ये आढळला. कमल हिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Instagram influencer Kamal Kaur found dead in a locked car in Bathinda) धक्कादायक म्हणजे, कमल कौर हिला दहशतवादी अर्श डल्ला याच्याकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्या धमकीचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. आता कमल कौर हिचा मृतदेह आढळल्यामुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. कमल कौर सोशल मीडियावर अश्लील कॉन्टेंट तयार करत असल्यामुळे टीकेचा सामनाही करावा लागत होता.

पंजाबमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कमल कौर उर्फ कंचन कुमारी हिचा मृतदेह बठिंडामधील आदेश रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये एका कारमध्ये आढळला. कमल ही लुधियानाची रहिवासी आहे, तिचा मृतदेह बठिंडामध्ये आढळला, त्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी कमलच्या हत्येचा संशय व्यक्त करत तपास सुरू केला आहे.

Instagram influencer Kamal Kaur death case
Ajit Pawar : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, अकोला दौऱ्यात घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रुग्णालयाच्या पार्किंगमधील एका कारमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी कार तपासली. पण कार आतमधून लॉक होती, त्यात कमल कौर हिचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही कार मंगळवारपासून पार्किंगमध्ये उभी होती.

Instagram influencer Kamal Kaur death case
Tuljapur Tragedy: "माझ्यावर प्रेम कर नाहीतर...", छेडछाडीला कंटाळून पोलिसाच्या मुलीनं गळफास घेतला

कमल कौर इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. तिचे ३.८६ लाख फॉलोअर्स होते. वादग्रस्त आणि अश्लील रील्स कमल नेहमीच चर्चेत होती. अश्लील रील्समुळे कमल हिला वारंवार टीकेला सामोरे जावे लागले होते. सात महिन्यांपूर्वी अर्श डल्ला याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कमलच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होतोय. पोलिसांकडून आता सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. कार कोणी आणली? कमल कौर स्वतः कार चालवत होती का? हत्या करून मृतदेह कारमध्ये ठेवला का? याचा तपास करण्यात येत आहे.

Instagram influencer Kamal Kaur death case
Reel Star Anvi Kamdar News : रीलस्टार अन्वी कामदारचा धबधब्यात बुडून मृत्यू, रील बनवताना झाला अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com