Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : दिवाळी गोड! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹१५०० येणार, आदिती तटकरेंची माहिती

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून, पुढील काही दिवसांत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Mukhyamantri Ladki Bahin Yojana September Installment Date : राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरेंनी खुशखबर दिली आहे. लडकीच्या खात्यात आजपासून १५०० रूपये येण्यास सुरूवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील पात्र लाडकीच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाईल, असे तटकरेंनी सांगितलेय. (₹1500 Ladki Bahin Yojana payment update today)

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचे १५०० रूपये येणार, याबाबत माहिती अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. दिवाळीच्या तोंडावर लाडकीच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांची दिवाळी होड होणार आहे. Maharashtra women scheme September installment

लाडकीच्या खात्यात खटाखट १५०० रूपये येणार, मंत्री काय म्हणाल्या? How to check CM Ladki Bahin Yojana E-KYC status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !

ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. त्यांनाच योजनेचा हफ्ता मिळणार असल्याचे समजतेय. मात्र योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक लाडकींना त्याचा फटका बसणार आहे. शासनाला या योजनेचा आर्थिक भार पेलवत नाही हे वास्तव असलं मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारेवरची कसरत करत सरकार निधीची तरतूद करत आहेत. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा, राज्य निवृत्त वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. Aditi Tatkare announcement on Ladki Bahin scheme

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडून ४१०.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनूसुचित जाती घटकांकरिता पात्र लाभार्थ्यांसाठी हा निधी असेल. हा निधी मंजूर करताना सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा लाभ मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Control Tips: दररोज हा १ पदार्थ खाल्याने कोलेस्टेरॉलचा धोका होईल कमी; वाचा फायदे

Maharashtra Live News Update:घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्या; सचिन घायवळवर मोक्का दाखल

Ananya Panday: चॅनेल गर्ल...; अनन्या पांडेचा पॅरिस फॅशन वीकमधील सिझलिंग लूक पाहिलात का?

३४७ तालुक्यातील शेतकऱ्यांना ३१ हजार कोटींची सरसकट मदत; तुमचा तालुका आहे का? पाहा यादी

Marathi Upcoming Movie: वडील अन् मुलींच्या नात्यांचा भावनिक प्रवास, ‘तू माझा किनारा’ ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT