Sanjay Biyani Saam Tv
महाराष्ट्र

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; बियाणी हत्येतील मास्टरमाइंड ताब्यात

पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटक या सहा राज्यात आरोपींचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संतोष जोशी

नांदेड: तब्बल ५५ दिवसानंतर नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येतील सहा आरोपींना अटक करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. या हत्येमागे पाकिस्तानात असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा हात आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटक या सहा राज्यात आरोपींचा शोध घेण्यात आला, अशी माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस (Police) महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज दिली. (Biyani Murder Case)

पकडण्यात आलेले इंदरपालसिंग उर्फे सनी मेजर, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, सतनामसिंग उर्फ सत्ता शेरगिल, हरदिपसिंग उर्फ सोनू बाजवा, गुरुमुखसिंग गिल, करणजितसिंघ साहू अशी आरोपींचे नावे आहेत. सर्व आरोपी हे मुळचे नांदेडचे असल्याची माहितीही तांबोळी यांनी दिली.

या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे. तसेच बियाणींवर गोळीबार करणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. खंडणीसाठीच बियाणींची हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. दरम्यान सहाही आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या शोधात पोलीस (Police) अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, एसआयटी प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह ६० जणांच्या टीमने ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.( Biyani Murder Case)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT