नवी दिल्ली: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली वार्ता आहे. वैश्विक बाजारात घसरण नोंदवल्यानंतर देशांतर्गत बाजारातही सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. गेल्या काही सत्रांमध्ये सातत्याने सोन्याचे दर (Gold Rate) वाढत असतानाच, आज किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याचा दहा ग्रॅमचा दर पुन्हा ५० हजारांजवळ पोहोचला आहे. तर चांदीचाही दर किलोमागे ६१ हजारांच्या खाली आला आहे. (Gold Price Today Updates)
मल्टीकमोडीटी एक्स्चेंजवर (MCX) बुधवारी सकाळी ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा वायदा भाव ३७५ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ५०, ४८० रुपयांवर आला. सकाळी व्यवहार सुरू होताच, भाव ५०, ६५४ रुपयांवर खुला झाला होता. मात्र, गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने ०.७४ टक्क्यांची घसरण नोंदवली. याआधी सोन्याची वायदा किंमत ५१ हजारांच्या जवळपास होती.
चांदीही घसरली
सोन्याच्या दराप्रमाणेच आज चांदीचा (Silver) भावही घसरला. सकाळी एमसीएक्सवर चांदीची वायदा किंमत ५१२ रुपयांनी कमी होऊन ६०,६१३ रुपये प्रतिकिलो इतकी झाली. तत्पूर्वी व्यवहार सुरू झाल्यानंतर चांदी प्रतिकिलो ६०,७५२ रुपयांवर ट्रेडिंग सुरू झाली होती. मात्र, मागणीत घट नोंदवली गेल्याने किंमती ०.८४ टक्क्यांची घसरण नोंदवली. गेल्या काही सत्रांत चांदीचा भाव ६२ हजारांच्या वर होता.
वैश्विक बाजारात घसरण
वैश्विक बाजारातही आज सकाळी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकी बाजारात आज सकाळी सोन्याचा हाजिर भाव ०.२४ टक्क्यांनी कमी होऊन १,८३२.१६ डॉलर प्रति औंसवर आला. तर चांदीचा हाजिर भाव ०.२७ टक्क्यांनी कमी होऊन २१.४४ डॉलर प्रति औंस राहिला. वैश्विक बाजारातील घसरणीनंतर भारतीय भांडवली बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट पाहायला मिळाली.
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर (जीएसटी, टीसीएस आणि इतर वगळता)
मुंबई - ४७,७५०
चेन्नई - ४७,९२०
दिल्ली - ४७,७५०
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.