Kolhapur, aam aadmi party andolan, ajit pawar saam tv
महाराष्ट्र

Aam Aadmi Party News: "दादा, मुंबईत पोचलासा काय? काेल्हापूरातून 'आप' युवा आघाडीचा अजित पवारांना प्रश्न; जाणून घ्या आंदाेलन

Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांना काेणत्या आश्वासनाची युवकांनी करुन दिली आठवण.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीने काेल्हापूरात आंदाेलन (aam admi party andolan in kolhapur) छेडले. या पक्षाच्या युवा आघाडीने पाेस्टरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. (Maharashtra News)

गेले अडीच महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे. मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते.

या पार्श्वभूमीवर आप युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत "दादा, मुंबईला पोचलासा काय? पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या" अशा आशयचे पोस्टर धरून शहरातील छत्रपती शिवाजी चौक, दसरा यासारख्या विविध चौकात नागरिकांचे लक्ष वेधले.

"शासन आपल्या दारी, पण आयुक्त नाही कोल्हापूर नगरी", "सरकार एका रात्रीत बनतंय, मग आयुक्त द्यायला 3 महिने का" असे पोस्टर झळकवत काेल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले.

युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी साम टीव्हीशी बाेलताना आंदाेलनाबाबतची माहिती विषद केली. यावेळी शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिग्विजय चिले, अमरसिंह दळवी, संजय नलवडे आदी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT