Ravikant Tupkar vs Raju Shetti : असं काय लिहिलं रविकांत तुपकरांनी... शिस्तपालन समितीला राजू शेट्टींनाच धाडावं लागलं पत्र

वारंवार तेच ते म्हणणे कितीवेळा मांडू...? असे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
Ravikant Tupkar, swabhimani shetkari sanghatana, Raju Shetti
Ravikant Tupkar, swabhimani shetkari sanghatana, Raju ShettiSaam TV
Published On

- संजय जाधव / रणजीत माजगावकर

swabhimani shetkari sanghatana news : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या सूचनेनूसार मंगळवारी त्यांचे म्हणणे मांडले आहे. यामध्ये तुपकर यांनी राजू शेट्टींवर (swabhimani shetkari sanghatana leader raju shetti) गंभीर आराेप केले आहेत. तुपकरांच्या (Ravikant Tupkar) आराेपांवर आता शेट्टींनी खूलासा करावा असे शिस्तपालन समितीने ठरवलं आहे. यामुळे पेल्यातलं वादळ पेल्यातच राहणार की आणखी काय हे आगामी काळात राज्यातील शेतक-यांसह जनतेला समजणार आहे. (Maharashtra News)

Ravikant Tupkar, swabhimani shetkari sanghatana, Raju Shetti
Earthquake In Satara, Sangli, Kolhapur : पाटणसह सांगली काेल्हापूरला भूकंपाचा धक्का, काेयना धरण सुरक्षित

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांना संघटनेच्या शिस्तपालन समितीने १५ ऑगस्ट पर्यंत समिती समोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यासाठीचा अवधी दिला होता. रविकांत तुपकर यांनी समिती समोर प्रत्यक्ष हजर झाले नसले तरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना त्यांनी सविस्तर असे पत्र लिहले आहे. या पत्राच्या माध्यमातून आपल्या व्यथा, आक्षेप त्यांनी सविस्तरपणे व्यक्त केले आहेत. शिवाय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनाही त्यांनी पाठविले असल्याचे कळते.

Ravikant Tupkar, swabhimani shetkari sanghatana, Raju Shetti
Shravan Mass 2023 : व्हीआयपी दर्शन सुविधा बंदनंतर भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचा आणखी एक माेठा निर्णय; ग्रामस्थांनाे! जाणून घ्या नियमावली

साम टीव्हीशी बाेलताना रविकांत तुपकर म्हणाले राजू शेट्टी यांना आपण ४-५ वर्षांपासून आपले म्हणणे वारंवार सांगत आलेलो आहे. शिवाय शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे असे म्हटलं आहे.

रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना दिलेल्या पत्रात अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडींचा व संघटनेच्या कार्याचा उल्लेख आहे. शिवाय संघटनेची विविध आंदोलने, तुपकरांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार,तडीपारी, तुरुंगवास असा एकंदरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चळवळीचा आणि राजकीय प्रवास याबद्दल पत्रात उल्लेख केला आहे.

Ravikant Tupkar, swabhimani shetkari sanghatana, Raju Shetti
Navi Mumbai Crime News : 300 रुपये न दिल्याने पनवेलच्या मित्राला संपवलं, संभाजीनगरातून एकास अटक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना या पत्रातून मांडण्यात आल्याचे समजते. प्रत्येक निवडणुकीत राजू शेट्टी यांची बदलती राजकिय भूमिका आणि त्याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेला परिणाम, संघटनेच्या कार्यपद्धतीवर असलेला आक्षेप यासह इतर बाबी पत्रात नमूद असल्याचे कळते.

नेमके कोणते आक्षेप तुपकरांनी या पत्रात मांडले, हे कऴू शकले नाही, मात्र ९ ते १० पानांच्या या पत्रात तुपकरांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि व्यथा नमूद केल्याचे कळते. आता याबाबत राजू शेट्टी व शिस्तपालन समिती काय तुपकरांच्या आक्षेपांबाबत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Ravikant Tupkar, swabhimani shetkari sanghatana, Raju Shetti
महाराष्ट्र नव्हे हे तर सुलतानी सरकार, 'हा' निर्णय म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ : आमदार कैलास पाटील

तुपकरांचे राजू शेट्टींवर आराेप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी मध्ये अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे. यापूर्वीच राजू शेट्टी यांनी हे पेल्यातलं वादळ असून लवकरच ते मिटेल असं म्हटलं होतं, मात्र 8 ऑगस्टला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

15 ऑगस्टला सायंकाळी रविकांत तुपकर यांनी आपला लेखी खुलासा शिस्तपालन समितीकडे पाठवलेला आहे. या खुलाशामध्ये त्यांनी राजू शेट्टींवर अनेक आरोप केलेले आहेत. या आरोपा संदर्भात शिस्तपालन समितीने राजू शेट्टी यांना देखील खुलासा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. येत्या 19 ऑगस्ट पर्यंत राजू शेट्टींनी खुलासा करावा अशा सूचनाही शिस्तपालन समितीने राजू शेट्टी यांना केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com