नारळ म्हटल की आपणास कोकणाची आठवण होते.मात्र,सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कूरुल या गावात 60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. पण ही किमया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी साधली आहे.
नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे रा. कुरूल ता. मोहोळ जि.सोलापूर असे नारळाच्या या बुटक्या )जातीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. विष्णू ननवरे यांचे शिक्षण 1969 ला अकरावी पर्यंत झाले आहे.
सोलापूरातील विष्णु ननवरे या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने 40 डिग्री सेल्सीयस तापमानात त्यांनी ही नारळाची बाग एका एकरात फुलवली.एका एकरात नारळाच्या झाडांची रोप 15 बाय 15 वर लागवड केली आहे.एका एकरात 145 नारळाची रोपाची लागवड त्यांनी केली आहे.
एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभर पेक्षा अधिक नारळ मिळत आहे.ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना 70 ते 75 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे.तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखाचा उत्पन्न देखील त्यांनी मिळवला आहे.
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात.तर 145 झाडे एकरी 4 ते 5 लाखांचे उत्पादन देतात.ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता.या झाडाला भरपूर नारळ येतात.या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही.नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.विष्णू ननवरे यांच्या नारळाच्या बागेचा पंचक्रोशीतच नाही तर सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.