Onion Price : कांदा दरात ८०० रुपयांची घसरण; आवक वाढल्याचा परिणाम

Nashik News : नाशिकच्या कांद्याला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने कांद्याचे सरासरी दर ३ हजार १०० रुपयांवर पोहचले होते. लासलगावसह पुणे बाजार समितीमध्ये देखील कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: मागील आठवड्यात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. अर्थात मागणी वाढल्याने बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत होता. मात्र आता पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होत असून आठवड्याभरात ७०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कांद्याचे सरासरी दर २२०० रुपयांवर खाली घसरले आहेत. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 

नाशिकच्या कांद्याला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने कांद्याचे सरासरी दर हे ३ हजार ते ३ हजार १०० रुपयांवर पोहचले होते. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीसह पुणे बाजार समितीमध्ये देखील कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. दरम्यान अन्य राज्यातील कांदा देशांतर्गत पोहचू शकत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चांगला भाव मिळत असताना गेल्या आठवड्या पासून कांद्याचे दर घसरले आहेत. 

Onion Price
Bhimashankar Temple : भीमाशंकर दर्शन आजपासून ४८ तासांसाठी खुले; भाविकांसाठी दर्शनासाठी खास सुविधा

आवक वाढल्याने दरात घसरण 

नाशिकच्या लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला सरासरी २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये दर सध्या मिळत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात ७०० ते ८०० रुपयांनी घट झाली आहे. तर आवक सुद्धा वाढली असून अन्य राज्यातील कांदा देशावर पोहचत असल्याने कांद्याच्या दर कमी झाले असले तरी होळीपर्यंत सध्या जे दर आहे ते तसेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. 

Onion Price
Sambhajinagar Police : छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलिस ठाण्यांत सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क; जलद तपासासाठी निर्णय

शेतकरी संकटात 

आठ दिवसांपूर्वी कांद्याचा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी आणू लागले होते. मात्र सध्या दरात घसरण होत असून पुढील पंधरा- वीस दिवस हे दर असेच राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भाव घसरल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com