Sambhajinagar Police : छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलिस ठाण्यांत सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क; जलद तपासासाठी निर्णय

Sambhajinagar News : सोशल मीडियावर किंवा अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदनामी करून मानसिक त्रास देणे, संवेदनशील डेटा चोरी करणे असे अनेक प्रकार सध्या सायबर भामट्यांकडून होण्याचे प्रमाण वाढले आहे
Sambhajinagar Police
Sambhajinagar PoliceSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलिस ठाण्यात आता सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क असणार आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने जलद तपासासाठी संभाजीनगर शहरातील १६ पोलिस ठाण्यांमध्ये अशा तक्रारींसाठी स्वतंत्र डेस्क सुरू करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतला आहे. त्यानुसार डेक्स सुरु करण्यात येत आहे. 

सध्या हॅकिंग, फिशिंग म्हणजेच लोकांना फसवून त्यांची वैयक्तिक माहिती किंवा बँक खाते नंबर, पासवर्ड इत्यादी प्राप्त करून फसवणूक केली जात आहे. तसेच मैलवेयरद्वारे डेटा चोरी करणे, रॅन्सम वेअर म्हणजे डेटा चोरी करून त्या बदल्यात पैशाची मागणी करणे, ऑनलाईन फसवणूक, ऑनलईन शॉपिंग फसवणूक, क्रेडिट कार्ड स्कॅम्स, ऑनलईन छळ, सोशल मीडियावर किंवा अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदनामी करून मानसिक त्रास देणे, संवेदनशील डेटा चोरी करणे असे अनेक प्रकार सध्या सायबर भामट्यांकडून होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 

Sambhajinagar Police
Erandol Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिलेचा मृत्यू, पतीसह तीन मुले गंभीर

एकाच सायबर पोलीस ठाण्यावर होता लोड 

दररोज अनेक जण या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून बळी ठरत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात एकच सायबर पोलिस ठाणे असून जिथे तक्रारदार धाव घेत होते. अर्थात सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या तक्रारींमुळे आलेल्या तक्रारींचा लवकर दखल घेण्यात अडचणी येत होत्या. एक तक्रार निकाली लागत नाही; तोच दुसरी तक्रार दाखल होत असते. यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र डेस्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sambhajinagar Police
Bhimashankar Temple : भीमाशंकर दर्शन आजपासून ४८ तासांसाठी खुले; भाविकांसाठी दर्शनासाठी खास सुविधा

पोलीस उपनिरीक्षकावर जबाबदारी 

आता सायबर तक्रारींसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र डेस्क करण्यात येत असून सायबर क्राईम संदर्भात तपास व चौकशी जलद गतीने होण्यासाठी आणि तांत्रिक पुरावे गोळा करून प्रभावीपणे तपास करता येईल. यादृष्टीने प्रत्येक पोलिस ठाण्यात १ उपनिरीक्षक आणि २ अंमलदार यांच्यावर जबाबदारी असणार आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com