49 villagers from blekhed hospitalised after drinking impure water Saam Digital
महाराष्ट्र

Akola: दूषित पाणी प्यायल्याने 49 ग्रामस्थ आजारी, तिघांची प्रकृती गंभीर;बेलखेडमध्ये आराेग्य विभाग डेरेदाखल

49 villagers from blekhed hospitalised : दूषित पाण्यामुळे बेलखेडमधील काही ग्रामस्थांना जूलाब, मळमळ होऊन उलटी होणे, पोट दुखणे यासारखे आजाराची लक्षणे दिसून आली.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेड़ गावात दूषित पाणी प्यायल्यामुळे तब्बल 49 ग्रामस्थ आजारी पडले आहेत. या सर्व ग्रामस्थांवर तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे 14 विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकाच्या अंतर्गत उपचार सुरू आहेत. उर्वरित तीन जणांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना अकोला शासकीय रुग्णालय आणि अन्य तिघांना तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामपंचायत द्वारे सुरु असलेल्या बोअर वेलवरून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. ग्रामपंचायत प्रशासनानं तसंच आरोग्य विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे, असाही आरोप आता गावकरी करु लागले आहेत.

14 पथके गावात दाखल

आरोग्याच्या दृष्टीने बेलखेड येथे ६ सुपरवायझर, १ विस्तार अधिकारी, रुग्णांचे उपचार उपचाराकरिता १० समुदाय आरोग्य अधिकारी, ६ एमबीबीएस डॉक्टर, २ तालुका अधिकारी, १ जिल्हास्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले.

गावकऱ्यांनी दुषित बोअर वेलचे पाणी पिऊ नये. उघड्यावर शाैचास जाऊ नये व कोणतेही लक्षण आढळ्यास जवळील आरोग्य अधिकाऱ्यांस दाखवून उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाळवे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले

मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT