Tadoba News : ताडोबामध्ये व्याघ्र प्रकल्पात नो यू-टर्न, नो रिव्हर्स; फिरायला जाण्याआधी नवे नियम नक्की वाचा

Tadoba Andhari Tiger Reserve New Rules : पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सफारी दरम्यान यु टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे.
Tadoba Andhari Tiger Reserve New Rules
Tadoba News Saam TV

संजय तुमराम

चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सफारी दरम्यान यु टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

Tadoba Andhari Tiger Reserve New Rules
Tiger Shroff Birthday: वयाच्या १४ व्या वर्षी मार्शल आर्टचा सराव; 'हिरोपंती'मधून केलं डेब्यू, टायगर श्रॉफला अशी लागली ॲक्शनची चटक

टी 114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी कोर भागात पर्यटन करत असल्याचे फोटो नुकतेच वायरल झाले होते. त्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. यामध्ये एकूण 10 जिप्सी -गाईड व चालक यांना पर्यटन साखळीतून निलंबित केले गेले. त्यानंतर संबंधित घटकांची बैठक घेत प्रशासनाने हा नवा नियम लागू केलाय.

दरम्यान, गेल्या वर्षभराच्या काळात ज्या-ज्या पर्यटक जिप्सी आणि गाईड यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा विविध 15 प्रकरणांमध्ये वेगळी स्वतंत्र कारवाई करत या 15 जिप्सी व गाईड यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 48 तासात एकूण कारवाईची संख्या 25 वर पोचली आहे.

ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक जिप्सीचालक आणि गाईड यांच्यावर आणत असलेला दबाव लक्षात घेता त्यांना शिस्त लावण्यासाठी हा धडक निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स आणि यु टर्न मारण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

नियम मोडल्यास कारवाई

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने म्हटलं आहे की, अनेकदा वाघ पाहण्यासाठी पर्यटक गाईडवर दबाव आणतात.त्यांना पैशांचे प्रलोभन दाखवतात. त्यामुळे गाईडकडून चूका होतात. तर रिव्हर्स आणि यु टर्न घेतल्यास त्या जिप्सींवर आणि गाईडवर कडक कारवाई होणार असा इशाराही देण्यात आला आहे.

Tadoba Andhari Tiger Reserve New Rules
Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार; सावरला परिक्षेत्रातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com