Tadoba : पर्यटकांनाे! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात फिरा आता इलेक्ट्रिक जिप्सीतून

Tadoba National Park : ताडोबाच्या एका सफारीसाठी जिप्सी चालकांना किमान ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. इलेक्ट्रिक जिप्सीमुळे १५ रुपयांत एक सफारी पूर्ण करता येते.
Tadoba National Park
Tadoba National Parksaam tv
Published On

Chandrapur News :

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या ताडोबाच्या मोहर्ली, मामला आणि कोलारा या ३ प्रवेशद्वारांवर या जिप्सी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

ताडोबात पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात मात्र आता सफारीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.

Tadoba National Park
युवा पिढीने Social Media चा वापर सामाजिक ऐक्यासाठी करावा : पोलिस अधीक्षक श्रवण दत्त

सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्याने सफारी दरम्यान पशु-पक्ष्यांना होणारा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना प्राणी आणि जंगल अगदी जवळून पाहता येते. सर्वात महत्वाचं म्हणजे या जिप्सींमुळे जिप्सीचालकांच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे.

Tadoba National Park
Kamlapur Elephant Camp : हत्तींना वैद्यकीय रजा, कमलापूरचा हत्ती कॅम्प 12 दिवस राहणार बंद

ताडोबाच्या एका सफारीसाठी जिप्सी चालकांना किमान ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. आता इलेक्ट्रिक जिप्सीमुळे फक्त १५ रुपयांच्या चार्जिंगमध्ये एक सफारी पूर्ण करता येते. त्यामुळे जिप्सीचालक आणि पर्यटक इलेक्ट्रिक जिप्सींना जास्त प्रमाणात परवानगी देण्याची मागणी करताहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Lakar

Tadoba National Park
Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर प्रशासनचा मोठा निर्णय, 'या' दिवशी भाविकांना पहाटे १ वाजल्यापासून मिळणार दर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com