Ahmednagar Water Supply: पाणीबाणी ! उत्तर नगर जिल्ह्यात 50 गावांना 43 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahmednagar Water News: राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावामध्ये देखील पाणी टंचाई असून ग्रामस्थांना मागील काही दिवसांपासून एक ते दोन किलोमीटर पायी चालत जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते.
Ahmednagar Water Supply: पाणीबाणी ! उत्तर नगर जिल्ह्यात 50 गावांना 43 टँकरद्वारे पाणीपुरवठा
50 villages get water from 43 tanker in nagar Saam Tv

- सचिन बनसाेडे

अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी अनेक तालुक्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याचाही प्रश्न निर्माण झाल्याने नागरीकांसह शेतकरी हवालदिल झाला आहे.

Ahmednagar Water Supply: पाणीबाणी ! उत्तर नगर जिल्ह्यात 50 गावांना 43 टँकरद्वारे पाणीपुरवठा
Tuljapur: पुजारी मंडळाला हवे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे पद, जाणून घ्या मागण्या

फेब्रुवारी महिन्यापासूनच नगर जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टॅंकर संगमनेर तालुक्यात सुरू आहेत. तर अकोले, राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.

राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावामध्ये देखील पाणी टंचाई असून ग्रामस्थांना मागील काही दिवसांपासून एक ते दोन किलोमीटर पायी चालत जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत गावातील काही भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

उत्तर नगर जिल्ह्यात तालुकानिहाय टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेले गाव

१) संगमनेर - ( गाव ३६ ) - एकूण २७ टँकर

२) अकोले - ( गाव ४ ) - एकूण ६ टँकर

३) कोपरगाव - ( गाव ४ ) एकूण ४ टँकर

४) राहाता - ( गाव - १ ) एकूण १ टँकर

५) नेवासा - ( गाव - ५ ) एकूण ५ टँकर

50 गावांना 43 टँकरने पाणीपुरवठा

Edited By : Siddharth Latkar

Ahmednagar Water Supply: पाणीबाणी ! उत्तर नगर जिल्ह्यात 50 गावांना 43 टँकरद्वारे पाणीपुरवठा
Dharashiv : 10 दिवसांपूर्वी झाला हाेता विवाह, पतीला पत्नीचा पाहावा लागला मृतदेह; नेमकं काय घडलं नळदुर्ग किल्ल्यात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com