Onion, Manchar APMC Market,  Saam tv
महाराष्ट्र

Onion Price Hike? कांद्याचा दर गगनाला भिडणार? बाजार समितीच्या निर्णयाने भाजी मंडईत चिंता

40 per cent export duty on onion : बाजार समित्या शेतक-यांच्या पाठीशी राहत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे.

रोहिदास गाडगे

Manchar APMC Market News : कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करुन कांद्याच्या बाजारभावावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. तसेच ४० रुपये प्रतिकिलो हमी बाजरभाव मिळावा या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आडते आणि व्यापा-यांकडुन पुढील दिवस बाजार समितीत कांदा लिलाल बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.  (Maharashtra News)

कांद्याचा दराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील नाशिकसह अन्य जिल्ह्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. आजही राहूरी तालुक्यात शेतकऱ्यांनी रास्ता राेकाे आंदाेलन छेडले.

दरम्यान साठवणुकीतील कांद्याची विक्रमी आवक बाजारात होत आहे. कांद्याच्या वजनातही मोठी घट पहायला मिळत आहे. तसेच मिळणारा बाजारभाव परवडणारा नाही. त्यातच कांद्यावरील निर्यात शुल्क लागु करण्यात आल्याने कांद्याची खरेदी करुन व्यापारीही अडचणीत येत असल्याने कांदा खरेदीला ब्रेक लागला आहे. परिणामी कांदा खरेदी बंद होत असताना शहरी भागात तुटवडा जाणवणार आहे. यामुळे किरकाेळ विक्रीत (भाजी मंडई) पुन्हा कांदा चढ्या दराने विकत घ्यावा लागणार अशी शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Maharashtra Live News Update: श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT