marigold, nanded news, farmer
marigold, nanded news, farmersaam tv

Success Story : श्रावणात झेंडूला मागणी वाढली, 13 हजार रूपयांत शेतक-याने मिळविले लाखाे रुपयांचे उत्पन्न

Shravan Mass 2023 : श्रावण महिन्यांत विविध धार्मिक असतात. त्यासाठी नागरिकांना फुलांची गरज भासते.
Published on

- संजय सूर्यवंशी

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका फुल शेतीसाठी म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात सर्वच प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात इतर फुलांसोबतच झेंडूच्या फुलांना मोठी मागणी वाढली आहे. (Maharashtra News)

marigold, nanded news, farmer
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

मुदखेड तालुक्यातील वाडी(मुक्ताई) या गावातील विजय इंगोले या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 13 गुंठे जमिनीत झेंडूची लागवड केलीय. सध्या त्यांची ही बाग झेंडूच्या फुलांनी बहरलीय. या झेंडूच्या लागवडीसाठी इंगोले यांना केवळ 13 हजार रुपये खर्च आला.

marigold, nanded news, farmer
Nandurbar News : 1 कोटी 5 लाख रुपये चाेरल्याप्रकरणी नाशकातून एकास अटक, नंदूरबार पाेलिसांची कारवाई

नांदेडच्या फुल मार्केटमध्ये ही झेंडूची फुले विक्रीसाठी जातात. सध्या या फुलांना चांगला भाव मिळतोय. 13 गुंठे जमीन आणि 13 हजार रुपये खर्च वजा करता दोन महिन्यात झेंडूच्या माध्यमातून विजय इंगोले (farmer) यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

श्रावण महिन्यांत विविध धार्मिक असतात. त्यासाठी नागरिकांना फुलांची गरज भासते. त्यामुळे शेतकरी फुलांच्या शेतीकडे वळू लागले आहेत असेही चित्र सध्या राज्यातील विविध भागात दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com